Maratha Reservation Protest : मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे, या प्रमुख मागणीसाठी मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे-पाटील (Manoj Jarange-Patil) यांनी मुंबईतील आझाद मैदानावर आमरण उपोषण सुरू केले आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यातून मराठा समाज मोठ्या संख्येने मुंबईत दाखल होत असून या आंदोलनाला व्यापक पाठिंबा मिळत आहे.