
मनोज जरांगे पाटील यांनी आज सकाळी 10 वाजल्यापासून मुंबईतील आझाद मैदानात उपोषणाला सुरुवात केली आहे. त्यांच्या या उपोषणामुळे दक्षिण मुंबईत मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. सध्या गणपती उत्सवाच्या पार्श्वभूमीवर या भागात भक्तांचीही प्रचंड गर्दी आहे, त्यामुळे परिस्थिती आणखी गुंतागुंतीची बनली आहे. त्यामुळे राज्य सरकारचे शिष्टमंडळ आज संध्याकाळी मनोज जरांगे यांची भेट घेऊन चर्चा करण्याची शक्यता आहे.