
मुंबई: मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण आता पाचव्या दिवशी पोहोचले आहे. मुंबई हायकोर्टाने दिलेली मुदत संपली तरी जरांगे आणि त्यांचे समर्थक आझाद मैदान सोडण्यास तयार नाहीत. कोर्टाने राज्य सरकारला आंदोलनाची वस्तुस्थिती सादर करण्याचे आदेश दिले असून, पोलीसही मैदानात दाखल झाले आहेत. या पार्श्वभूमीवर हायकोर्टाचा पुढील निर्णय काय असेल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मराठा आरक्षण आंदोलनाने मुंबईत वाहतूक विस्कळीत झाली असून, सामान्य नागरिकांना मोठी गैरसोय होत आहे.