मराठी कलाकार खड्ड्यांवर भडकले, सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल

टीम ईसकाळ
मंगळवार, 17 सप्टेंबर 2019

हे खड्डे इतके भयानक आहेत की, काहींचा जीव गेलाय. आपल्या काही मराठी कलाकारांनाही या खड्ड्याचे व बिकट रस्त्यांचे अत्यंत वाईट अनुभव आलेत. त्यामुळे या कलाकारांनी सोशल मीडियावर संताप व्यक्त केला आहे.  

मुंबई : गेल्या महिन्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईची पुरती वाट लागली आहे. रस्त्यांना असंख्य खड्डे पडले आहेत. महापालिका आपल्या कामात कुठेतरी कमी पडताना दिसत आहेत, अशातच मराठी कलाकारांनीही प्रशासनाला धारेवर धरत रस्त्यांवरील खड्ड्यावरून टीका सुरू केली आहे. 

डॉ. खुर्जेकरांच्या निधनावर सुबोध भावे हळहळला, म्हणाला...

हे खड्डे इतके भयानक आहेत की, काहींचा जीव गेलाय. आपल्या काही मराठी कलाकारांनाही या खड्ड्याचे व बिकट रस्त्यांचे अत्यंत वाईट अनुभव आलेत. त्यामुळे या कलाकारांनी सोशल मीडियावर संताप व्यक्त केला आहे.  

ज्येष्ठ अभिनेता प्रशांत दामले यांनी संताप व्यक्त करत ‘कल्याण = उत्तम नाट्यरसिक, कल्याण = थर्ड क्लास रस्ते’,अशी उपरोधिकपणे टीका केली आहे. तर ‘खड्डे,बेशिस्तपणा,निष्काळजीपणा आणि देशाच्या वाहतुकीचे नियम न पाळता जीव घेणारे छुपे दहशतवादी’, अशी खरमरीत टीका अभिनेता सुबोध भावेने केली आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Marathi Actors gets angry on potholes in Mumbai