esakal | अखेर मराठीत जाहिरात, CSMT ते कल्याण वातानुकूलित लोकलची जाहिरात मराठीत
sakal

बोलून बातमी शोधा

अखेर मराठीत जाहिरात, CSMT ते कल्याण वातानुकूलित लोकलची जाहिरात मराठीत

मध्य रेल्वे मार्गावरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कल्याण पहिली एसी लोकलची सोशल मीडियावर जाहिरातबाजी सुरू केली.

अखेर मराठीत जाहिरात, CSMT ते कल्याण वातानुकूलित लोकलची जाहिरात मराठीत

sakal_logo
By
कुलदिप घायवट

मुंबई: मध्य रेल्वे मार्गावरून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कल्याण पहिली वातानुकूलित (एसी) लोकल 17 डिसेंबर 2020 ला सुरू झाली. मात्र या लोकलला प्रवाशांचा प्रतिसाद मिळला नाही. त्यामुळे या एसी लोकलची सोशल मीडियावर जाहिरातबाजी सुरू केली. मात्र एसी लोकलची जाहिरात फक्त हिंदी भाषेत केली. मात्र लोकलला प्रतिसाद मिळाला नाही. आता, स्थानिक भाषा असलेल्या मराठीत जाहिरातबाजी करून प्रवाशांना एसी लोकलचा वापर करण्याचे आवाहन मध्य रेल्वेकडून करण्यात आले आहे.

रेल्वे प्रशासनाकडून सातत्याने मराठी भाषा डावलत असल्याचे दिसून येत आहे. त्रिभाषा सूत्री नियमांचे उल्लंघन केले जात आहे. मात्र 'सकाळ'ने याविरोधात वारंवार बातम्या प्रकाशित केल्या. 3 जानेवारी रोजी 'सकाळ'ने ' स्थानिक भाषेला डावलून हिंदी भाषेला प्राधान्य दिले' अशा आशयाची बातमी केली होती. त्यानंतर मध्य रेल्वे प्रशासनाने तातडीने याची दखल घेत मराठीत जाहिरात करण्यास सुरूवात केली. त्यानुसार सीएसएमटी ते कल्याण दरम्यान एसी लोकलचा प्रवास आणि रस्त्यामार्गे कारने प्रवास याची तुलना केली आहे. यामधील संवाद मराठी भाषेत तयार केला आहे. यामुळे एसी लोकलच्या प्रवासी संख्येत आणि महसूलात वाढ होण्याचा प्रयत्न केला जात आहे. 

मुंबई विभागातल्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

एसी लोकलला प्रवाशांचा अद्याप प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे या एसी लोकलची सोशल मीडियावर जाहिरातबाजी सुरू केली. मात्र मध्य रेल्वे प्रशासनाने स्थानिक भाषेला डावलून फक्त हिंदी भाषेत गाणी बनविले आहे. यातून एसी लोकलचे फायदे सांगितले आहेत. तर, एक चित्रफीत बनवली आहे. यामध्ये प्रवाशांकडून पर्यायी वाहतूक आणि एसी लोकल यांची तुलना केली आहे.

हेही वाचा- भिवंडीत मनसे कार्यकर्त्यांकडून टोरंट वीज कार्यालयाची तोडफोड

यामध्ये स्वस्त, वेळेत आणि थंडगार प्रवासाचे महत्त्व मांडले आहे. मात्र हा सर्व संवाद फक्त हिंदी भाषेत केला आहे. तरी देखील एसी लोकलला प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे मध्य रेल्वे स्थानिक भाषेत जाहिरातबाजी करून मराठी प्रवाशांना लोकल प्रवास करण्यास आकर्षित करण्याचा प्रयत्न केला गेला आहे. महाराष्ट्रात मराठी भाषेला प्राधान्य देण्यात येत नाही. त्यामुळे मराठी भाषिकांनी याबाबत तक्रार दाखल करून मध्य रेल्वेला फटकारले होते.

--------------------------

(संपादन- पूजा विचारे)

Marathi advertisement CSMT to Kalyan AC local for revenue increase

loading image
go to top