esakal | भिवंडीत मनसे कार्यकर्त्यांकडून टोरंट वीज कार्यालयाची तोडफोड
sakal

बोलून बातमी शोधा

भिवंडीत मनसे कार्यकर्त्यांकडून टोरंट वीज कार्यालयाची तोडफोड

भिवंडीतील वीज ग्राहकांना गेल्या 6 महिन्यापासून टोरंट वीज कंपनी कडून वाढीव वीज बिल पाठविण्यात येत आहेत. त्यामुळे संतप्त झालेल्या मनसेच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक पावित्रा घेतला.

भिवंडीत मनसे कार्यकर्त्यांकडून टोरंट वीज कार्यालयाची तोडफोड

sakal_logo
By
शरद भसाळे

मुंबईः भिवंडीतील वीज ग्राहकांना गेल्या 6 महिन्यापासून टोरंट वीज कंपनी कडून वाढीव वीज बिल पाठविण्यात येत आहेत. त्यामुळे संतप्त झालेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आज दुपारी आक्रमक पावित्रा घेतला.  मनसेच्या कार्यकर्त्यांनी भिवंडीतील अंजूर फाटा ओसवाल वाडी येथे असलेल्या वीज कंपनीच्या कार्यालयावर हल्ला केला आहे. या तोडफोडीत कार्यकर्त्यांनी दरवाजाच्या काचा फोडून वीज कंपनीच्या मनमानी कारभाराचा निषेध केला आहे.

मुंबई विभागातल्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

शहरातील अंजूरफाटा येथील ओसवालवाडी येथे टोरंट वीज कंपनीचे ग्राहक सुविधा केंद्र आहे. तेथे वीज बील भरण्याचे काम होत असते. कोरोना लॉकडाऊनमुळे सर्वत्र उद्योग व्यवसाय बंद असताना वीज ग्राहकांना मोठ्या प्रमाणात वीज बील आल्याने ग्राहकां मध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. त्यामुळे आज दुपारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहरध्यक्ष मनोज गुळवी यांच्या नेतृत्वाखाली मनसे कार्यकर्त्यांनी वीज कंपनीच्या कार्यालयाचा दरवाजाचे काचा फोडून निषेध आंदोलन केले.

हेही वाचा- गेल्या ११ महिन्यात राज्यात २ हजार २७० शेतकऱ्यांच्या आत्महत्या

-------------------

(संपादन- पूजा विचारे)

Torrent power office vandalized by MNS activists in Bhiwandi

loading image
go to top