esakal | 'मराठी भाषा भवना'साठी अखेर दीर्घ प्रतीक्षेनंतर मुंबईत जागा
sakal

बोलून बातमी शोधा

'मराठी भाषा भवना'साठी अखेर दीर्घ प्रतीक्षेनंतर मुंबईत जागा

'मराठी भाषा भवना'साठी अखेर दीर्घ प्रतीक्षेनंतर मुंबईत जागा

sakal_logo
By
विराज भागवत

महसूल विभागाने गिरगाव चौपाटी जवळच्या परिसरातील जागा उपलब्ध करून देण्यासाठी जीआर केला जारी

मुंबई: मराठी भाषेच्या विकासासाठी मागील अनेक वर्षांपासून प्रतिशत प्रतिक्षेत असलेले मराठी भाषा भवन चे (Marathi Bhasha Bhavan) मुख्य कार्यालय मुंबईत उभे राहणार आहे. यासाठी महसूल विभागाने गिरगाव चौपाटी जवळ असलेल्या (चर्नी रोड) जवाहर बाल भवन परिसरातील जागा उपलब्ध करून देण्यासाठी जीआर जारी केला. (Marathi Bhasha Bhavan finally gets Place in Mumbai Near girgaon chowpatty)

हेही वाचा: "तर त्याच मशालीने विमानतळ जाळून टाकू"; उद्धव ठाकरेंना इशारा

नक्की काय आहे योजना-

मराठी भाषा भवनसाठी गिरगाव महसूल विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या शिक्षण जवाहर बाल भवन शेजारी असलेल्या मोकळ्या भूखंडाची एकूण 2 हजार 105 चौरस मीटर क्षेत्र ( प्रत्यक्षात 1555+ 530=2085 चौ.मी.) अशी जागा मिळणार आहे. या जागेचा मराठी भाषा विभागाने स्वतंत्र विकास करावा, शिवाय मंजूर करण्यात आलेला जमिनीचा नियोजित वापर पुढील पाच वर्षात सुरू करावा असे त्यात म्हटले आहे. तसेच मराठी भाषा विभागाला या जमिनीचा वापर अतिरिक्त प्रयोजनासाठी करण्याचे ठरल्यास त्यासाठी महसूल व वन विभागाची पूर्वपरवानगी घेणे आवश्यक असणार आहे. शिवाय भाषा विभागाच्या संकुलातील सभागृह व इतर सुविधांचा आवश्‍यकतेनुसार विनामूल्य वापर करण्यासाठी महसूल विभागात पूर्णपणे अधिकार राहणार आहे. त्यामुळे ही जमीन आरक्षण सीआरझेड तसेच संरक्षित वने इत्यादी बाबत कक्षेत येते काय, यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी खात्री करून घ्यावी असेही आदेश ही यात देण्यात आले आहेत. त्यासोबतच या जीआर मध्ये जवाहर बाल भवन आणि शासकीय मुद्रणालय या दोन्ही वास्तूंच्या पुनर्विकासाचा एकत्रित विचार उद्योग विभागाने करावा, त्यामुळे नवीन इमारती या वेगवेगळ्या असू शकतात असेही सूचित करण्यात आले आहे.

हेही वाचा: "लोकलने प्रवास करू द्या किंवा मुंबईकरांना ५ हजार भत्ता द्या"

एकाच छत्राखाली सर्व कार्यालये...

मराठी भाषा विकासासाठी राज्यात विविध ठिकाणी असलेले भाषा विकासासंदर्भातील कार्यालय एकाच ठिकाणी आणण्याचे मुख्य प्रयोजन या भाषा भवनामुळे मराठी विश्वकोश, भाषा संचालनालय, साहित्य व संस्कृती मंडळ आणि भाषा विकास संस्था या चार संस्थांचा कारभार एकाच छायाछत्रा खाली येईल.

मंत्रिमंडळाच्या निर्णयानंतर माघार

मागील सहा वर्षांपासून मुंबईत मराठी भाषा भवन उभे करण्यासाठी अनेकदा घोषणा झाल्या, त्यात मार्च 2018 मध्ये मंत्रिमंडळाने निर्णय घेऊन मराठी भाषा भवन हे वांद्रे-कुर्ला संकुलात उभे करण्याचे ठरविले होते, मात्र तो विषय ही मागे राहिला.कामा रुग्णालयाच्या शेजारी एका इमारतीत हे भाषा भवन उभे केले जाणार होते ,परंतु त्याला परवानगी देताना महापालिकेने खो घातला.

हेही वाचा: सॉफ्टवेअर इंजिनियर तरूणीला बाबा बंगालीने फसवलं; वाचा सविस्तर

ऐरोलीतील उपकेंद्र मागे राहिले.

मराठी भाषा भवनाचे उपकेंद्र उभे करण्यासाठी ऐरोलीत सेक्टर-13 मध्ये जागा निश्चित करण्यात आली होती. त्यासाठी जीआरही काढण्यात आला. सिडकोने यासाठी जागा उपलब्ध करून दिली. 32 हजार चौरस फुटाच्या बांधकामाचा प्रस्ताव या ठिकाणी होता मात्र तोही मार्गी लागला नव्हता.

loading image