मराठी माणसाच्या मागे मराठी माणसाने उभे राहिले पाहिजे : उर्मिला मातोंडकर

मराठी माणसाने उभे राहिले पाहिजे असे मत सिने अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी मांडले.
Mumbai
MumbaiSakal
Updated on

मुंबई : कोकणा मधील गणेशोत्सवाची सर जगात कुठेही येणार नाही. समाजिक भान ठेवून गणेशोत्सव साजरा केला तर त्याचे सोने होते. ती संकल्पना पारितोषिक प्राप्त देखाव्यातून दिसली.ते देखावे वाखाणण्यासारखे आहेत.मराठी माणसाच्या मागे मराठी माणसाने उभे राहिले पाहिजे असे मत सिने अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी मांडले.

दादर शिवाजी पार्क येथील स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृहात जाणीव संस्थेने आयोजित केलेल्या गणेश देखावा पारितोषिक वितरण समारंभात त्या बोलत होत्या.या कार्यक्रमाला स्पर्धेची संकल्पना मांडणारे खा.अरविंद सावंत,प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी उपस्थित होते.या वेळी उर्मिला मातोंडकर यांच्या हस्ते अंतिम फेरीतील विजेत्यांना पारितोषिके देण्यात आली.

Mumbai
अकोला : राज मोरे यांच्या पहिल्याच लघुपटाला राष्ट्रीय पुरस्कार

उर्मिला मातोंडकर यांनी या कार्यक्रमाचे भव्य रूप पाहून व मी आपल्या लोकांमध्ये आले असल्याचे मला वाटते.मी खूप देश फिरले. पण इथे आल्यानंतर बाप्पाच्या संकल्पनेवर वेगळे देखावे ज्यांनी उभारले त्यांना पारितोषिके देताना आनंद झाला.मी आपल्या लोकांमध्ये पुन्हा येईन व परितोषक विजेत्यांचे कौतुक करेन असे सांगून मराठी व्यक्ती व मराठीसाठी उभे राहिले पाहिजे असे त्या म्हणाल्या.यावेळी खासदार अरविंद सावंत यांनी आपल्या भाषणात सांगितले की, ही स्पर्धा आयोजित करण्या संदर्भात मला सचिन परब यांनी 3 महिन्यांपूर्वी सांगितले.तेव्हा त्यांना मी लगेच होकार दिला. व माझ्या जाणीव फौंडेशन तर्फे कार्यक्रम घ्यावा असे सुचविले. समाजाला जाणीव राहिली पाहिजे.जाणीवेची नेणीव असावी लागते. असे ते म्हणाले. आम्ही ही स्पर्धा केवळ मुंबई व उपनगरापूरती आयोजित केली होती.

Mumbai
मुंबई : रिलायन्सचे पहिले बहुद्देशीय मोबिलिटी स्टेशन नावडे येथे सुरू

पण संपूर्ण राज्यातून प्रवेशिका आल्या त्याही घेतल्या मग, परदेशातून म्हणजे अमेरिका, टोकियो, नेदरलँड येथून ही प्रवेशिका आल्या. समाजाला दिशा देण्याचे काम आपण करत आहोत म्हणून त्याही प्रवेशिका घेतल्या. त्यामुळे ही स्पर्धा जागतिक स्वरूपाची झाल्याचे सांगून

लोकमान्य टिळकांनी घरातला गणपती रस्त्यावर आणून त्याला सार्वजनिक रूप दिले. सामाजिक लढाई स्वराज्याची लढाई होईल .ती लढाईच होती. स्वराज्य मिळाले पण सुराज्य कुठे आहे.? असा सवाल खासदार अरविंद सावंत यांनी विचारला. ऑनलाइन झालेल्या सजावट स्पर्धेचे परीक्षक मराठी मालिका दिग्दर्शक विवेक देशपांडे, नेपथ्यकार सुनील देवळेकर, अभिनेत्री रुचिरा नाबर हे होते. या तिघांचा तसेच स्पर्धेत योगदान दिलेल्या सर्वांचा सन्मान उर्मिला मातोंडकर यांच्या हस्ते करण्यात आला.नगरसेविका अरुंधती दुधवडकर, माजी महापौर व नगरसेविका स्नेहल आंबेकर,यांच्यासहित अनेक मान्यवर उपस्थित होते. महाराष्ट्र देशा या मनोरंजनाच्या कार्यक्रमाने प्रेक्षकांची करमणूक केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com