अकोला : राज मोरे यांच्या पहिल्याच लघुपटाला राष्ट्रीय पुरस्कार

त्यांच्या या यशाने अकोल्याच्या सांस्कृतिक वैभवात मोलाची भर घातली आहे.
akola
akolasakal
Updated on

अकोला : अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये आपली मोहोर उमटवणाऱ्या 'खिसा' या मराठी लघूपटाला ६७ वा राष्ट्रीय पुरस्कार तर नॉन फिचर फिल्म कॅटेगरीत राज मोरे यांना सर्वाेत्कृष्ट उदयोन्मुख दिग्दर्शकाचा राष्ट्रीय पुरस्कार भारताचे उपराष्ट्रपती वैंकैया नायडू यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. त्यांच्या या यशाने अकोल्याच्या सांस्कृतिक वैभवात मोलाची भर घातली आहे.

कोविड-१९ च्या प्रकोपामुळे प्रलंबित असलेला राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळा अखेर विज्ञान भवन नवी दिल्ली येथे २५ ऑक्टोंबर रोजी पार पडला. यावेळी उपराष्ट्रपती वैंकैया नायडूू यांनी त्यांना पुरस्कार प्रदान केला. राज मोरे यांनी दिग्दर्शित केलेला खिसा हा पहिलाच लघुपट असून, या लघुपटला जगभरातील विविध चित्रपट महोत्सवामध्ये गौरविण्यात आले आहे. तब्बल २७ आंतरराष्ट्रीय पुरस्कारांसह अत्यंत प्रतिष्ठेचा असलेला दादासाहेब फाळके पुरस्कार देखील पटकाविला आहे. राज प्रीतम मोरे ख्यातनाम चित्रकार असून त्यांना यापूर्वी ५४ व्या राष्ट्रीय ललितकला अकॅडमी पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आले आहे.

akola
सावंतवाडीचा एम्स अकॅडमी संघ उपांत्य फेरीत 

पी.पी. सिने प्रॉडक्शन, मुंबई आणि लालटिप्पा निर्मित या लघुपटाची संहीता कैलास वाघमारे यांची असून संपूर्ण चित्रीकरण अकोला येथे झाले आहे. या लघुपटात कैलास वाघमारे, मीनाक्षी राठोड, श्रृती मधीदीप, डॉ. शेषपाल गणवीर आणि बालकलाकार वेदांत क्षीरसागर यांच्या भूमिका आहेत तर पारिजात चक्रवर्ती यांचे संगीत लाभले आहे. संकलनाची धुरा संतोष मैथानी यांनी सांभाळली असून सिमरजितसिंह सुमन यांनी छायाचित्र दिग्दर्शन केले आहे.

अकोल्यातील सांस्कृतिक चळवळीतील अग्रणी डॉ. गजानन नारे, उपजिल्हाधिकारी प्रा. संजय खडसे, अशोक ढेरे, प्रा. मधू जाधव, किशोर विभूते, शरद कोकाटे, रणजितसिंह बिंद्रा, निरज आवंडेकर, अरुण घाटाळे, नरेंद्र नायसे, दीपक चांडक, डॉ. नरेश बजाज, शाम तिवारी, किशोर पिंपळे तथा राज मोरे यांच्या मित्र परिवाराने या दैदिप्यमान यशासाठी त्यांचे स्वागत केले आहे.

akola
बहिरोबावाडीच्या तोरडमल परिवाराने कर्जतकरांसाठी दिला प्राणवायू

‘राष्ट्रीय पुरस्कार अकोल्यासह संपूर्ण विदर्भाचा’!

राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार संपूर्ण लघुपटाचा चमूसह अकोला आणि संपूर्ण विदर्भाचा आहे, अशी पोस्ट राज मोरे यांनी सोशल मीडियावर शेअर केली आहे. मूळचे अकोल्याचे असलेले राज मोरे यांनी त्यांचे कलाशिक्षण जे. जे. स्कूल ऑफ आर्टस् येथे पूर्ण केले असून गत २० वर्षांपासून कला क्षेत्रात नावलौकिक प्राप्त केला आहे. 'खिसा' हा लघूपट ग्रामीण मानसिकतेवर मार्मिक भाष्य करणारा असून सामाजिक सौहार्दाचा विषय त्यांनी अत्यंत संवदेनशील रितीने टिपला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com