फक्त गुजराती मारवाडी लोकांना एंट्री; मराठी मातीत मराठी माणसाला खेळण्यास 'नो एंट्री'

फक्त गुजराती मारवाडी लोकांना एंट्री; मराठी मातीत मराठी माणसाला खेळण्यास 'नो एंट्री'

डोंबिवली : एकीकडे सांस्कृतिक उपराजधानी म्हणून डोंबिवली शहराची ओळख आहे. इतकंच नाही नाही तर मराठमोळे सणही डोंबिवलीत आवर्जून साजरे केले जातात. मात्र, डोंबिवलीचे आमदार रविंद्र चव्हाण यांनीच मराठी माणसाची गळचेपी केल्याची चर्चा सध्या शहरात सुरू आहे. चव्हाण यांनी डोंबिवलीत एका क्रिकेट स्पर्धेचे आयोजन केले असून यात फक्त गुजराती, कच्छ, आणि मारवाडी समाजाच्या लोकांनाच सहभागी होता येईल अशी अट टाकली असल्याने मराठी माणसाच्या भुवया उंचावल्या आहेत.

या कार्यक्रमाचा बॅनर सध्या सोशल मीडियावर मोठया प्रमाणावर व्हायरल होत आहे. 

नमो रमो ट्रॉफी असं या क्रिकेट स्पर्धेचं नाव आहे. धक्कादायक बाब म्हणजे या सामन्यांच्या पोस्टरमध्ये खाली एक न लिहिण्यात आली आहे. ज्यामध्ये स्पष्टपणे फक्त गुजराती, कच्छी आणि मारवाडी याच नागरिकांना सहभाग घेता येईल असं नमूद करण्यात आलं आहे. दरम्यान या स्पर्धेचं पोस्टर व्हायरल झाल्यानंतर या स्पर्धेच्या आयोजनाला कडाडून विरोध करण्यात येतोय. 

सदर पोस्टर व्हायरल झाल्यानंतर या स्पर्धेच्या आयोजकांशी देखील संवाद करण्याचा प्रयत्न  करण्यात आला. मात्र या स्पर्धेच्या आयोजकांकडून कोणत्याही प्रकारची उत्तरं माध्यमांना देण्यात येत नाहीत. या सगळ्या वादात आता शिवसेनेकडून प्रतिक्रिया समोर येतेय. भाजपनं दोन समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करू नये, असं शिवसेनेचे नगरसेवक दीपेश म्हात्रे यांनी म्हटलं. 

marathi manus can not participate in namo ramo cricket matches competition in dombivali

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com