१९८१ मध्येच कोरोनाबद्दल 'या' पुस्तकात लिहिली गेली माहिती.. | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

१९८१ मध्येच कोरोनाबद्दल 'या' पुस्तकात लिहिली गेली माहिती..

१९८१ मध्येच कोरोनाबद्दल 'या' पुस्तकात लिहिली गेली माहिती..

मुंबई : संपूर्ण जगभरात 'कोरोना' नावाचा व्हायरस पसरत चालला आहे. चीनच्या वूहान शहरातून कोरोना व्हायरस पसरायला सुरुवात झाली असं म्हंटलं जातं. त्यानंतर संपूर्ण चीनमध्ये यामुळे तब्बल ३००० पेक्षा जास्त लोकांचे कोरोनामुळे बळी गेले आहेत. आता हा भयंकर व्हायरस संपूर्ण जगभरात पसरत चालला आहे. भारतातही कोरोनाचे ५ संशयित रुग्ण आढळले आहेत. सोशल मीडियावर याबाबत अनेक तर्क-वितर्क लावले जात आहेत. असाच एक खळबळजनक दावा सोशल मीडियावर काही जणांकडून केला जातोय. १९८१ मध्ये प्रसिद्ध झालेल्या एका कादंबरीत कोरोनाबद्दल भविष्यवाणी करण्यात आली आहे असा दावा सोशल मीडियावर केला जातोय. काही लोकं याला खरंच भविष्यवाणी मानत आहेत. 

सावधान! म्हणून महिलांच्या हनुवटीवर येतात माणसांसारखे केस.. 

कोणती आहे ही कादंबरी:

या कादंबरीचं नाव 'द आइज ऑफ डार्कनेस' असं आहे. लेखक 'डिन कोंटोझ' यांनी कोरोनाचा उल्लेख त्यांनी ४० वर्षांपूर्वी लिहिलेल्या या कादंबरीत केला आहे. ही कादंबरी त्याकाळी चांगलीच प्रसिद्ध झाली होती. थ्रीलर कादंबरी असल्यामुळे त्याकाळी ही वाचकांच्या पसंतीला उतरली होती. 

काय आहे या कादंबरीतली भविष्यवाणी:

या कादंबरीत रंजक आणि खिळवून ठेवणारी कथा सांगण्यात आली आहे. कोरोना व्हायरस २०२० मध्ये जगभरात पसरतो अशी कथा या कादंबरीत लिहिण्यात आली आहे. लेखकांनं यात 'वूहान-४००' या व्हायरसचा उल्लेख केला आहे.

  •  'वूहान-४००' हा व्हायरस वूहान शहराच्या बाहेर RDNA प्रयोगशाळेत बनवण्यात आला होता.
  • जैविक शस्त्र असलेला हा व्हायरस ४०० सूक्ष्मजीवांच्या मदतीनं बनवण्यात आला होता.
  • 'वूहान-४००' चा दुष्प्रभाव फक्त मानवी शरीरावर होत होता, प्राण्यांवर नाही.

अशा प्रकारची कथा या कादंबरीत सांगण्यात आली आहे. मात्र ही कथा शहराच्या नावासह अगदी सारखी आहे. त्यामुळे लोकं याला भविष्यवाणी मानत आहेत.

हेही वाचा: खरंच घोरपडीच्या तेलाने सेक्स पावर वाढते का?.. जाणून घ्या यामागचं व्हायरल सत्य..  

मात्र खरंच ही भविष्यवाणी आहे का? जे या कादंबरीच्या कथेत सांगण्यात आलंय ते आज तसंच घडतंय का ? लेखकाला याबद्दल ४० वर्षांपूर्वीच माहिती होतं का? असे काही प्रश्न सध्या तरी अनुत्तरीतच आहेत.     

predictions of corona virus in 40 years old novel read full story 

Web Title: Predictions Corona Virus 40 Years Old Novel Read Full Story

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :IndiaChina
go to top