"पुरे झालं हिंदू-मुस्लिम राजकारण, मी हे थांबवणार" - इजाझ खान

"पुरे झालं हिंदू-मुस्लिम राजकारण, मी हे थांबवणार" - इजाझ खान

मुंबई : कधी 'फूड डिलेव्हरी बॉय'ला मदत तर कधी कधी 'मॉब लिंचींग'वर भाष्य करणारा बॉलीवूड अभिनेता आणि रियलीटी शो स्टार इजाझ खान ने निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतलाय. मुंबईतील भायखळा या अत्यंत चुरशीच्या अशा मतदारसंघातून इजाझ खान आपलं नशीब आजमावणार आहेत. 

"भायखळ्यातील नागरिकांना अनेक नागरी समस्यांना सामोरं जावं लागतंय. मुलभूत सुविधादेखील भायखळ्याच्या नागरिकांना मिळत नाहीयेत. अशातच मला भायखळ्यातील नागरिक नक्की साथ देतील. हिंदू मुस्लिम नावानं राजकारण करणं आता पुरे झालं. मी अश्याप्रकारचं राजकारण थांबवण्यासाठी आलोय. आता धर्माच्या पलीकडचं राजकारण झालं पाहिजे",असं मत इजाझ खान यांनी मांडलं आहे.

इजाझ खान यांनी भायखळा मतदार संघातून आपला अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केलाय. भायखळ्यात या अत्यंत चुरशीची लढत होतेय. यात MIM चे वरीस पठाण, शिवसेनेच्या माजी नगरसेविका यामिनी जाधव, कॉंग्रेसकडून माजी आमदार मधू चव्हाण तर अखिल भारतीय सेनेच्या गीता गवळी निवडणूक लढवतायत. इजाझ खान यांना सिलिंडर हे निवडणूक चिन्ह मिळालंय.

आयुष्यात एकदातरी निवडणूक लढवून नेतागिरी करावी असं अनेकांना वाटतं असतं, यातंच आता  इजाझ खान यांची भर पडलीये.  त्यामुळे आधिच चौरंगी होतं असलेल्या लढतीत इजाझ खान यांच्यावर मतदारराजा उदार होतो का हे पहावं लागेल. 

WebTitle : marathi news big boss fame ijaz khan will contest election from byculla constituency  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com