घरबसल्या 'हे' करा आणि कमवा दरमहा 20 हजार 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 15 ऑक्टोबर 2019

इंटरनेटवर अशी अनेक संकेतस्थळं आहेत ज्याच्या माध्यमातून तुम्ही पैसे कमवू शकतात. पण मेहनतीने कमावलेले पैसे कधीही योग्य.

'वर्क फ्रॉम होम' हे शब्द सगळ्यांनीच ऐकले असतील. यात प्रामुख्याने डेटा-एन्ट्रीचे जॉब सध्या फारच फेमस आहेत. पण, तुम्हाला जर घरात बसून कोणतही डेटा-एन्ट्रीचं काम न करता पैसे कमवायचे असतील तर काय केलं पाहिजे? चला आम्ही तुम्हाला अश्या काही वेबसाइट्स सांगतो ज्यातून घरबसल्या बसून तुम्ही महिन्याला 20 हजार रुपये कमवू शकता. 

सध्या जमाना आहे इंटरनेटचा, यात अश्या अनेक वेबसाइट्स आहेत ज्या ऑनलाइन जाहिरातीवर क्लिक करून तुम्ही हजारोंची कमाई करू शकता. होय अशा वेबसाइट्स आहेत ज्या जाहिरातींवर क्लिक करण्यासाठी पैसे देतात.      

प्राईझ रिबेल - PrizeRebel 

या वेबसाईटवर तुम्ही सर्वेक्षण करून पैसे कामु शकतात. या साइटवरून तुम्ही महिन्याला साधारण दहा हजार कमवू शकतात. तुम्हाला या साइटवर 100 गुण कमावले तर त्याचा तुम्हाला 1 डॉलर मिळतो. 

स्वॅगबक्स SWAGBUCKS

या संकेतस्थळावर कमावलेल्या गुणांच्या माध्यमातून तुम्ही अॅमेझोनवरून खरेदी करू शकतात. यात तुमच्या आसपासच्या गोष्टी आणी सेवांची माहिती तुम्ही घेऊ शकतात. या संकेतस्थळावर तुम्हाला प्रत्येक जाहिरातीवर क्लिक करण्याचे गुण मिळत राहतात.  

क्लिक्ससेन्स - ClixSens 

जाहिरातींमधून पैसे कमवण्यासाठी हे चांगलं संकेतस्थळ आहे. अनेक लोकं या संकेतस्थळावरून 15 हजार रुपये दर महिन्याला कमावतायत. या साइटवरून तुम्ही तुमच्या PayTM किंवा PayPal च्या माध्यमातून पैसे काढू शकतात. वय, लिंग आणि लोकेशन या बेसिसवर तुम्हाला जाहिराती दिसतात. 

निओबक्स 

जर तुम्ही संकेतस्थळांवर क्लिक करून पैसे कमवाच्या तयारीत असाल तर हे संकेतस्थळ सर्वात जास्त वापरलं जाणारं असं आहे. यातून तुमचे 1 डॉलर झाल्यावर तुम्ही पैसे काढू शकतात.   

संकेतस्थळांवर क्लिक करून सध्या अनेकजण पैसे कमवत आहेत. यात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या सर्व वेबसाइट्च्या अटी आणि शर्थी तपासूनच पुढे जा. यात मोबाईल वरून पैसे कमावता येत नाही. त्यासाठी कॉम्पुटरचा वापर करावा लागतो. 

वरील सगळ्या गोष्ठी या फक्त माहितीसाठी शेअर करण्यात आल्यात. मेहनतीने कमावलेले पैसे कधीही योग्य.

WebTitle : marathi news earn upto 20 thousand by clicking on online advertising 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news earn upto 20 thousand by clicking on online advertising

टॅग्स
टॉपिकस
Topic Tags: