esakal | HDIL ची 5 हजार कोटीची मालमत्ता जप्त 
sakal

बोलून बातमी शोधा

HDIL ची 5 हजार कोटीची मालमत्ता जप्त 

HDIL ची 5 हजार कोटीची मालमत्ता जप्त 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

PMC बँक घोटाळ्याप्रकरणी ईडीन HDIL कंपनीची तब्बल ५ हजार कोटीची मालमत्ता जप्त केलीय. येत्या काही दिवसात देशातील आणखी काही मालमत्ता सील केल्या जाणार आहेत. PMC  बॅँकेकडून HDIL नं साडेतीन हजार कोटीचे कर्ज घेतले असून त्याची परतफेड केलेली नाही. याप्रकरणी पोलिसांनी HDILचा कार्यकारी संचालक राकेश वाधवा आणि त्याचा मुलगा सारंग उर्फ सन्नी वाधवा याना ३ ऑक्टोबरला अटक केलीय.

  • HDIL च्या मदतीसाठी पीएमसी बँकेच्या अधिकाऱ्यांनी बनावट कागदपत्रांच्या आधारे 44 गुप्त खाती बनवली होती.
  • ही खाती गौपनीय पद्धतीनं चालवली जात होती. 
  • रिझर्व्ह बँकेच्या ऑडिटमध्ये ही खाती दाखवली गेली नव्हती.
  • ही खाती ती पासवर्ड प्रोटेक्टेड होती

ईडीने मुंबई व जवळपासच्या परिसरातील सहा विविध ठिकाणी शोध मोहिम राबवली आहे. याप्रकरणी 44 संशयीत खात्यांपैकी 10 खात्यांचा गैरव्यवहार उघड झाला असून, उर्वरीत 34 खात्यांची माहिती उघड करण्यात आलेली नाही, त्यामुळे सध्याची 4355 कोटींचा गैरव्यवहाराची रक्कम वाढण्याची शक्यता आहे. 

रिजर्व बॅंकेने केलेल्या तक्रारीनंतर आर्थिक गुन्हे शाखेने बॅंकेचे निलंबीत संचालक जॉय थॉमस, अध्यक्ष वरियर सिंग व इतर पदाधिकारी तसेच एचडीआयएलचे संचालक राकेश वाधवा, सारंग वाधवा यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. ईडीनेही आता याप्रकरणी आता मनी लाँडरिंगचा करतेय.  

Web Title : marathi news ED seized 5 thousand crore property of HDIL in PMC bank fraud case

loading image