esakal | "घातक परिणाम भोगावे लागतील" म्हणत महाराष्ट्र 'CID' ची वेबसाईट हॅक
sakal

बोलून बातमी शोधा

"घातक परिणाम भोगावे लागतील" म्हणत महाराष्ट्र 'CID' ची वेबसाईट हॅक

"घातक परिणाम भोगावे लागतील" म्हणत महाराष्ट्र 'CID' ची वेबसाईट हॅक

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

मुंबई - मुस्लिम सर्वत्र आहेत याचं भान राहू द्या. मुस्लिमांवर होणारे अत्याचार थांबवा नाहीतर तुम्हाला घातक परिणाम भोगावे लागतील. अशी धमकी देत महाराष्ट्र पोलिसांच्या राज्य गुन्हे अन्वेषण विभागाची म्हणजेच CID ची वेबसाईट हॅक करण्यात आली आहे. 

याबद्दल सर्च केलं असता www.mahacid.gov.in टाकल्यानंतर हॅकर्सचा एक संदेश दिसत होता. यामध्ये गेल्या काही काळात भारतात मुस्लिमांची जमावाकडून हत्या केली गेलीये. गेल्या काळातील दंगलींमुळे ४५ पेक्षा जास्त लोक मारली गेली आहेत. त्यामुळे मुस्लिमांवर होणारे हल्ले थांबवा, असा इशारा यामधून देण्यात आलाय. 

मोठी बातमी -  मिठाच्या पाण्याने आंघोळ करण्याचे काही चमत्कारिक फायदे

THE GOVERNMENT OF IMAM MAHDI नावाने वेबसाईट हॅक करण्यात आली आहे. दरम्यान, या प्रकरणी आता सायबर सेलकडून चौकशी केली जातेय. नक्की ही वेबसाईट कुणी हॅक केली, हे मात्र अद्याप समजू शकलेलं नाही. 

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे भारत दौऱ्यावर असताना दिल्लीत मोठ्या प्रमाणात हिंसाचार उफाळला होता. या हिंसाचारादरम्यान अनेक मुसलमानांवर हल्ला करण्यात आला, असं या संदेशात म्हंटल आहे. भारतातील मोदी सरकारकडून हिंदू आणि मुसलमानांमध्ये तेढ निर्माण केली जात असल्याचं यामध्ये म्हटलंय. याच पार्श्वभूमीवर देशातील मुसलमानांवरील हल्ले थांबवा नाहीतर घातक परिणामांचा सामना करा असं देखील यामध्ये म्हटलंय.   

मोठी बातमी - आता 'कोरोना' तुम्हाला स्पर्श देखील करू शकणार नाही, कसा ? 'असा'...

दरम्यान सध्या महाराष्ट्र गुन्हे अन्वेषण विभाग म्हणजे CID ची वेबसाइट सध्या सुरळीत सुरू आहे.

marathi news maharashtra CIDs website has been hacked

loading image