शिरीष पै यांचे मुंबईत निधन 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 2 सप्टेंबर 2017

मुंबई : ज्येष्ठ साहित्यिक आणि सामाजिक कार्यकर्त्या शिरीष पै (वय 88) यांचे आज (शनिवार) वृद्धापकाळाने राहत्या घरी निधन झाले. शिरीष पै या आचार्य अत्रे यांच्या कन्या होत्या. 

शिरीष पै यांनी कथा, कविता, नाटक, ललित लेखन अशा सर्व प्रकारच्या साहित्यात उल्लेखनीय योगदान दिले. कारकिर्दीच्या सुरवातीला त्यांनी आचार्य अत्रे यांच्या 'मराठा'मध्ये पत्रकार म्हणून काम केले होते. 

शिरीष पै यांचा परिचय... 

 • जन्म : 15 नोव्हेंबर 1929 
 • शिक्षण : बी.ए. एल. एल. बी. 
 • कवितासंग्रह - कस्तुरी, एकतारी, आईची गाणी, एका पावसाळ्यात, ध्रुवा, गायवाट, हायकू, ऋतुचित्र, विराग. 
 • कथासंग्रह - चैत्रपालवी, सुखस्वप्न, मयूरपंख, मंगळसूत्र, हापूसचे आंबे, खडकचाफा, कांचनबहार, संधि प्रकाश, लव्हली, लग्न, जुनून, ह्रदयरंग, प्रणयगंध. 
 • कादंबरी - माझे नाव आराम, लालन बैरागीण, हेही दिवस जातील. 
 • ललितलेखसंग्रह - आतला आवाज, आजचा दिवस. 
 • व्यक्तिचित्र - पपा, प्रियजन, वडिलांच्या सेवेसी. 
 • नाटक - हा खेळ सावल्यांचा, कळी एकदा फुलली होती, झपाटलेली. 
 • वृत्तपत्रलेखन - पुस्तक परीक्षणे, मुलाखती, वाड्‌मयीन, अग्रलेख. 
 • संपादन - 'नवयुग' साप्ताहिक (1956 ते 1960), दैनिक 'मराठा' वाड्‌मयीन पुरवणी (1961 ते 1969), दैनिक 'मराठा' (1969 ते 1976). 
 • सन्मान - 'एका पावसाळ्यात' या कवितासंग्रहाला महाराष्ट्र राज्य सरकारचे 'केशवसुत' पारितोषिक, 'हायकू' या कवितासंग्रहाला महाराष्ट्र साहित्य परिषदेचे पारितोषिक.
Web Title: marathi news marathi websites Mumbai News Shirish Pai