esakal | ब्रिटन आणि अमेरिकेच्या तुलनेत भारतात दुसऱ्या लाटेचा सौम्य प्रभाव : वैद्यकीय तज्ज्ञांचे मत

बोलून बातमी शोधा

ब्रिटन आणि अमेरिकेच्या तुलनेत भारतात दुसऱ्या लाटेचा सौम्य प्रभाव : वैद्यकीय तज्ज्ञांचे मत}

कोरोनाची दुसरी लाट ही पहिल्या लाटेएवढी गंभीर नसेल आणि ती अल्पकाळ टीकेल. शिवाय, ब्रिटन आणि अमेरिकेच्या तुलनेत भारतात लाटेचा सौम्य प्रभाव असेल असे मत वैद्यकीय तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.

ब्रिटन आणि अमेरिकेच्या तुलनेत भारतात दुसऱ्या लाटेचा सौम्य प्रभाव : वैद्यकीय तज्ज्ञांचे मत
sakal_logo
By
भाग्यश्री भुवड

मुंबई  : कोरोनाची दुसरी लाट ही पहिल्या लाटेएवढी गंभीर नसेल आणि ती अल्पकाळ टीकेल. शिवाय, ब्रिटन आणि अमेरिकेच्या तुलनेत भारतात लाटेचा सौम्य प्रभाव असेल असे मत वैद्यकीय तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. दरम्यान, फेब्रुवारी महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून वाढलेली रुग्णसंख्या पाहता ही वाढ तितकीशी गंभीर नसल्याचे राज्य कोविड टास्क फोर्स सदस्यांनी ही सांगितले आहे  

फेब्रुवारी महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून मुंबईसह विदर्भातील बर्याच ठिकाणी रुग्णसंख्या आणि संक्रमणाचे प्रमाण जास्त वाढले. मुंबई, पुणे, नागपूर, अमरावती, नाशिक अशा काही भागांमध्ये ही वाढलेली संख्या दिसते. यात ही खूप गंभीर रूग्ण नाहीत. शिवाय, जास्त रुग्ण हे लक्षण नसलेले किंवा सौम्य लक्षण असलेले आहेत. मृत्युदर ही कमी आहे. त्यामुळे, जरी ही दुसऱ्या लाटेची चर्चा असेल तर तिची तीव्रता आधीपेक्षा कमी आहे असे राज्य कोविड टास्क फोर्स सदस्य डाॅ.अविनाश सूपे यांनी सांगितले. 

होम क्वारंटाईन पाळणे अत्यावश्यक- 

होम क्वारंटाईन किंवा संस्थात्मक क्वारंटाईन हे दोन्ही पाळणे अत्यावश्यक आहे. ज्येष्ठ नागरिकांचे होम किंवा संस्थात्मक क्वारंटाईन होणे गरजेचे आहे. ज्यामुळे त्यांच्या मृत्युची भीती कमी होईल. आणि एकूणच मृत्युदर कमी करण्यास मदत होईल. 

“कोरोना विषाणू- प्रकार आणि लसीकरण” या विषयावर न्यूबर्ग’च्या सदस्य मंडळाच्या झालेल्या चर्चेत कोरोना विषाणू प्रादुर्भावाची दुसरी लाट येणार असली तरीही ती पहिल्या लाटेइतकी गंभीर नसेल आणि लवकर विरून जाईल अशी माहिती समोर आली. 

याविषयी अपोलो रुग्णालयाचे संसर्ग विकार तज्ज्ञ डॉ. व्ही रामसुब्रमण्यम म्हणाले की, “अमेरीका, ब्रिटन, ब्राझील आणि युरोपातील काही अन्य देशांत कोरोना विषाणूंची दुसरी लाट आली आहे. हे अपरिहार्य होते. भारत या परिस्थितीला अपवाद ठरण्याचे काही कारण नव्हते. कदाचित दुसऱ्या लाटेचा प्रभाव हा बहुतांशी सौम्य असेल, कारण आपल्या लोकसंख्येत 60% नागरिक हे युवावस्थेतील आहेत. त्यामुळे आपल्याकडील दुसरी लाट ही ब्रिटन आणि अमेरिकेच्या तुलनेत सौम्य असेल. काही राज्यांत कोरोनाने पुन्हा डोके वर काढले आहे. मात्र, ती पहिल्या लाटेएवढी गंभीर नसेल. अल्प कालावधीतच ती जाईल.”

मुंबई, ठाणे, पालघर, रायगड परिसरातील बातम्यांचा आढावा घेण्यासाठी येथे क्लिक करा

न्युरोव्हायरोलॉजीचे माजी प्राध्यापक डॉ. व्ही. रवी यांनी सांगितले की, जर तुम्हाला संसर्ग झालेला नसेल किंवा लस घेतली नसेल तर विषाणू कधीही तुमच्या शरीरात शिरकाव करू शकतो. आपल्यापैकी अनेकांना या विषाणूंचा सामना करावा लागणार आहे.”
जेव्हा संसर्गाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर झाला, त्यावेळी लोक जबाबदारीने वागली. त्यामुळे संसर्ग होण्याचे प्रमाण खाली आले. जेव्हा प्रादुर्भाव वाढतो, त्यावेळी संसर्गाची सातत्याने चाचणी घेण्यात येते, त्याची नोंद ठेवली जाते, त्याचा शोध घेतला जातो. ज्यावेळी एखादी श्वसनसंबंधी संसर्गाची लाट येते, त्यावेळी दुसरी लाट येते हे खरे आहे. मात्र तिची तीव्रता पहिल्या लाटेप्रमाणे नसेल.” 

लस ठरेल उपयुक्त- 

काही प्रमाणात दुसऱ्या लाटेला अटकाव करण्यासाठी लस देखील साह्यकारी ठरेल असे मत न्यूबर्ग डायग्नोस्टीक्सच्या फ मायक्रोबायोलॉजीस्ट डॉ. सरन्या नारायण यांनी सांगितले.

---------------------------------------------------

marathi news Mild effects of the second wave in India compared to Britain and the United States coronavirus live update