जीन्स धुण्याचे अनधिकृत कारखाने तातडीने बंद करण्याचे आदेश

संजीत वायंगणकर
गुरुवार, 22 मार्च 2018

डोंबिवली - शीळ व दहिसर विभागात अनधिकृत घातक रसायनयुक्त पाण्याने जीन्स कापड धुण्याचे कारखाने सुरु करण्यात आले आहेत. या कारखान्यामधून निघणारे रसायनमिश्रीत व रंगीत विषारी सांडपाणी नाल्यामध्ये व शोषखड्ड्यामध्ये सोडले जात आहे. पर्यायाने नदी व शेतकऱ्यांचा शेतजमीनी आणि येथील नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. या प्रकरणी कल्याण ग्रामीणचे शिवसेना आमदार सुभाष भोईर यांनी पुढाकार घेऊन पर्यावरणमंत्री रामदास कदम यांच्याकडे हा प्रश्न मांडला होता. मंत्र्यांच्या आयोजित बैठकीत सदर जीन्स कापड धुण्याचे कारखाने तातडीने बंद करण्याचे आदेश कदम यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत. 

ग्रुप ग्रामपंचायत नागाव तसेच भंडार्ली या गावासमोरील असलेल्या गुरचरण जागेवर अनधिकृत गोडाऊन उभे केले असून, त्या गोडाऊनमध्ये जीन्स वर प्रक्रिया करण्याचा अनधिकृत व्यवसाय केला जातो. त्यापासून निघालेले घातक रारसायनयुक्त सांडपाणी गावाच्या दिशेने सोडले जात असून, गावात सर्व नाले, विहिरींमध्ये आरोग्यस घातक पाणी मिसळत आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून, गावातील पिण्याच्या पाण्याचे सर्व स्रोत प्रदूषित झाले आहेत. तसेच दिवसा व रात्रीच्या वेळी मोठ्या प्रमाणावर रसायनांची अनधिकृत विल्हेवाट लावण्यासाठी आग लावली जाते. त्यामुळे वायू व जलप्रदूषण मोठ्या प्रमाणावर होत आहे. या शिवाय या कारख्यान्यांच्या ठिकाणी पाण्यासाठी सुमारे 170 अनधिकृत बोअरवेल करण्यात आल्या असून, महानगरपालिकेने तातडीने कारवाई करून त्या बंद करण्याच्या सूचना देखील देण्यात आल्या आहेत. 

या बैठकीत प्रदूषण नियंत्रण मंडळ सदस्य सचिव डॉ. पी. अनबालगान, जि. प. सदस्य रमेश पाटील, सुनील अलिमकर, बाबुराव मुंडे, मंगल पाटील, यशवंत पाटील, किसन जाधव उपस्थित होते.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news mumbai jeans washing factory pollution