कल्याण डोंबिवली महापालिका परिवहन समिती सभापती पदासाठी एकमेव अर्ज दाखल

रविंद्र खरात
सोमवार, 5 मार्च 2018

कल्याण डोंबिवली महानगरपालिका परिवहन समिती सभापती पदासाठी भाजपा शिवसेना युतीच्या वतीने भाजपा परिवहन समिती सदस्य सुभाष म्हस्के यांचा एकमेव अर्ज दाखल झाला आहे.

कल्याण - कल्याण डोंबिवली महानगरपालिका परिवहन समिती (केडीएमटी) सभापती पदाची निवडणूक मंगळवार ता 6 मार्च रोजी दुपारी 3 वाजता होणार असून आज सोमवार ता 5 मार्च ला भाजपा शिवसेना युतीच्या वतीने भाजपा परिवहन समिती सदस्य सुभाष म्हस्के यांचा एकमेव अर्ज दाखल झाला असून, सभापती पदासाठी एकच अर्ज दाखल झाल्याने सभापती पदासाठी सुभाष म्हस्के यांची बिनविरोध निवड होणार असल्याचे स्पष्टं झाले आहे. 

कल्याण डोंबिवली महानगरपालिका परिवहन समिती (केडीएमटी) मध्ये शिवसेना भाजपा युतीची सत्ता असून दोन्ही पक्षाने सभापती पद एक वर्षासाठी वाटून घेतले असून शिवसेनेचे संजय पावशे यांचा 28 फेब्रुवारी रोजी कालावधी संपुष्टात आल्याने सभापती पदाची निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला असून मंगळवार ता 6 मार्च रोजी दुपारी 3 वाजता मतदान होणार आहे. आज सोमवार ता 5 रोजी सभापती पदासाठी भाजपा शिवसेना युतीच्या वतीने भाजपा परिवहन समिती सदस्य सुभाष म्हस्के यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. 

यावेळी महापौर राजेंद्र देवळेकर, उपमहापौर मोरेश्वर भोईर, सभागृह नेते राजेश मोरे, स्थायी समिती सभापती राहुल दामले, शिवसेना पालिका गटनेते रमेश जाधव, नगरसेवक नितीन पाटील, अभिमन्यू गायकवाड, अर्जुन भोईर, परिवहन समिती मावळते सभापती संजय पावशे, राजेंद्र दिक्षित संतोष चव्हाण, मनोज चौधरी, प्रसाद माळी, संजय राणे, कल्पेश जोशी, मधुकर यशवंतराव आणि भाजपा पदाधिकारी संजय मोरे समवेत मोठ्या संख्येने भाजपा पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते .सभापती पदासाठी भाजपा शिवसेना युतीच्या च्या वतीने सुभाष म्हस्के यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने त्यांची निवड बिनविरोध होणार असल्याचे स्पष्ट झाले असून केवळ उद्या होणाऱ्या सभेत निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहणारे ठाणे जिल्हाधिकारी महेंद्र कल्याणकर हे अधिकृत रित्या घोषित करतील. कल्याणपूर्व मध्ये जुन्या भाजपा कार्यकर्त्याला परिवहन समिती सभापती पद दिल्याने कल्याण पूर्व मधील भाजपाच्या कार्यकर्त्यानी आनंद व्यक्त केला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news mumbai kalyan Transportation Committee elections