विमानतळ रहिवाश्यांच्या मोर्च्याने दणाणले आझाद मैदान 

दिनेश चिलप मराठे
बुधवार, 21 मार्च 2018

मुंबई - मुंबईतील आझाद मैदान परिसर, भर उन्हात धड़कलेल्या मुंबई विमानतळ परिसर रहिवाशी संयुक्त कृती समितिच्या महामोर्चाने दणाणला. दिनांक २० मार्च २०१८ आलेल्या या मोर्चाचे नेतृत्व लक्ष्मण पुजारी यांनी केले. त्यांच्या सोबत सर्वच स्थानिक नेते आपापले वैयक्तिक स्वार्थ बाजूला ठेऊन घराच्या मागणीसाठी एकाच नेतृत्वा खाली आले होते. त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आपल्या विविध मागण्या भाषणांतून मांडल्या.

करण्यात आलेल्या मागण्या
१) विमानतल परिसर स्थानिक ठिकाणीच पुनर्वसन करण्यात यावे.
२) घरांच्या मोबदल्यात घर आणि दुकानांच्या मोबदल्यात दुकान मिळावे.
3) ५०० चौरस क्षेत्र फुटांचे सदनिका मिळावी.
४)एक लाख रूपयांचा सदनिका देखभाल खर्च मिळावा.
५)स्वतंत्र प्रकल्प घोषणा व मॉर्डन टाऊनशिप अंतर्गत पुनर्वसन करावे.
६)उपरोक्त सर्व मागण्यांवर धोरणात्मक निर्णय होई पर्यंत प्रशासनाद्वारे राबविण्यात येणारे शासकीय योजने अंतर्गत (नाला, रोड व पाईप लाइन)ही मनपा निष्कासन कार्रवाई थांबविण्यात यावी. 

महामोर्च्यात आलेल्या महिलांनी आपापली पाणी बाटली आणि जेवणाचा डबा आणला होता. महिलांची संख्या लक्षणीय दिसत होती. सकाळी 10 वाजता जमलेल्या आझाद मैदानातील मोर्चे कऱ्यात झोपड़पट्टी आणि बैठी घरे धारक बायाबापडयांसह काही लहान मुले आणि महाविद्यालयीन तरुण तरुणी देखील सामील होते.

मुख्यमंत्री कार्यालयाकडून मोर्चेकरी शिष्टमंडळास चर्चेचे आमन्त्रण आले, परंतु, प्रत्यक्ष चर्चा मात्र राज्य मंत्री रविन्द्र वायकर यांचेशी झालेली असुन, त्यांनी पंधरा दिवसांत या संदर्भात निर्णय घेत मागण्या बाबत  मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांचेशी चर्चा होईल, तसेच योग्य मार्ग निघेल असे म्हटल्याचे मोर्चाचे नेते लक्ष्मण पुजारी यांनी सांगितले.

मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी व्यासपीठावर येऊन मोर्चेकऱ्यांच्या पाठीशी महाराष्ट्र नवनिर्माण सेना भक्कमपणे अभी असुन, तुमच्या लढयात आम्हीही सामील असल्याचे म्हटले. सरकारने लवकरात लवकर विमानतळ परिसरातील स्थानिकांच्या सर्व मागण्या मान्य कराव्यात असे आवाहन केले.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news mumbai morcha devendra fadnavis