रस्त्याचे काम रखडलेल्यामुळे शिवसेनेचे रांगोळी आंदोलन

अक्षय गायकवाड
सोमवार, 12 फेब्रुवारी 2018

विक्रोळी(मुंबई) : विक्रोळीच्या पवई भागामध्ये प्रशांत अपार्टमेंट येथील रस्त्याचे दुरुस्तीचे काम गेले तीन महिने थांबलं आहे. याचा  निषेध करण्यासाठी रविवारी (ता.11) या भागातील रहिवाशी आणि शिवसैनिकांनी या काम रखडलेल्या रस्त्यावर महिला शिवसैनिकांनी रांगोळी काढून पालिका प्रशासनाचा निषेध केला.

विक्रोळी(मुंबई) : विक्रोळीच्या पवई भागामध्ये प्रशांत अपार्टमेंट येथील रस्त्याचे दुरुस्तीचे काम गेले तीन महिने थांबलं आहे. याचा  निषेध करण्यासाठी रविवारी (ता.11) या भागातील रहिवाशी आणि शिवसैनिकांनी या काम रखडलेल्या रस्त्यावर महिला शिवसैनिकांनी रांगोळी काढून पालिका प्रशासनाचा निषेध केला.

पवई पोलीस बिट चौकी आयआयटी मेनगेट ते पुंडलिक वीलापर्यंतच रस्ता पालिकेच्या सेंट्रल एजन्सी तर्फे दुरुस्तीसाठी खोदून ठेवण्यात आला आहे. परंतु या रस्त्याच्या दुरुस्तीचे काम ठप्प पडून आहे. गेली तीन महिने हा मुख्य रस्ता यामुळे रहदारीसाठी देखील बंद करून ठेवण्यात आला आहे. यामुळे या विभागात मोठ्या, शाळा, रुग्णालये असल्यामुळे शाळकरी विद्यार्थी व रुग्णांना त्रासाला सामोरे जावे लागते.

स्थानिक नागरिक आणि शिवसेनेतर्फे वारंवार पाठपुरावा करून देखील हे काम पूर्ण झाले नाही. अखेर स्थानिक नागरीक आणि शिवसैनिकांनी रविवारी एकत्र येऊन या  रस्तावर रांगोळ्या काढून अनोखे आंदोलन केले. यावेळी पालिका प्रशासनाचा निषेध करण्यासाठी जोरदार घोषणाबाजी ही करण्यात आली. गेले तीन महिने या रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या दुकानदारांना याचा मोठा फटका असून मालाचे ट्रक या ठिकाणी आणू शकत नाही. नागरिकांना रस्त्यावरून चालत येत नसल्याने नागरिक अर्धवट काम केलेल्या रस्त्यावरील खडी वरून घसरून  त्यांचा अपघात होतो. याबाबत शिवसेनेचे कार्यकर्ते  महापौरांचीही भेट घेणार आहोत. या आंदोलनात स्थानिक नागरिकांसह  मोठ्या प्रमाणात स्थानिक शिवसेनेचे कार्यकर्ते आणि महिला कार्यकर्त्याची सहभागी झाल्या होत्या.

आम्ही अनेक वेळा  तक्रारी करून सुद्धा पालिका अधिकारी या रस्त्याच्या कंत्राटदारावर कारवाई करत नाहीत तीन महिने झाले हा रस्ता रखडून ठेवला आहे. नागरिक त्रस्त झाले असताना पालिका अधिकारी मात्र सुस्त झाले असल्याने त्यांना जाग आणण्यासाठी आणि नागरिकांचा रोष दाखवून देण्यासाठी आम्ही हे आंदोलन केले आहे. आता केलेले आंदोलन हे सौम्य जरी असले तरी या रस्त्याचे काम योग्य पद्धतीने आणि लवकरात लवकर नाही झाले तर शिवसेना त्यानंतर तीव्र आंदोलन करेल" असा इशारा शिवसेना शाखा प्रमुख निलेश साळुंखे यांनी दिला. 

Web Title: Marathi news mumbai news agitation shivsena road