esakal | 'मातोश्रीवर' आश्वासनांचा पाऊस; वचननाम्यात मात्र 'आरे'चा उल्लेख नाही
sakal

बोलून बातमी शोधा

'मातोश्रीवर' आश्वासनांचा पाऊस; वचननाम्यात मात्र 'आरे'चा उल्लेख नाही

'मातोश्रीवर' आश्वासनांचा पाऊस; वचननाम्यात मात्र 'आरे'चा उल्लेख नाही

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई, ता. 12 : शिवसेनेचा विधानसभा निवडणुकपूर्व स्वतंत्र 'वचननामा' पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मातोश्रीवर प्रकाशित झाला.या वचननाम्यात मतदारांवर अनेक आश्वासनांची खैरात करण्यात आली आहे.भाजपचा जाहीरनामा येण्याआधीच शिवसेनेने आपला वचननामा जाहीर केला असून गोरगरीब जनतेच्या भावनांना हात घालण्याचा प्रयत्न केला आहे.

राज्याच्या तिजोरीवरील भार लक्षात घेऊन हा वचननामा आम्ही बनवला आहे.अत्यंत जबाबदारीने आम्ही हा वचननामा बनवला असून यातील प्रत्येक आश्वासन पूर्ण करणार असल्याचे उद्धव ठाकरेंनी सांगितले.सगळं काही मोफत देण्यात काही अर्थ नाही.सध्या मंदीचं वातावरण आहे,सर्व काही डळमळीत झालं आहे.यामुळे आवश्यक समतोल साधत आम्ही हा वचननामा बनवला असल्याचं उद्धव ठाकरे म्हणाले.आपल्या वचननाम्यासाठी भाजप आणि शिवसेना एकत्र बसली नाही मात्र मुख्यमंत्र्यांशी फोनवर चर्चा झाली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.


'आरे'चा उल्लेख नाही

शिवसेनेच्या जाहीरनाम्यात मोठमोठ्या आश्वासनांची खैरात करण्यात आली असली 'आरे'चा मात्र या वचननाम्यात उल्लेख ही नाही.याबाबत पत्रकारांनी उद्धव ठाकरेंना विचारलं असता 'स्थानिक वचननाम्यात' त्याचा उलकेख असल्याची सावरासावर उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंनी केली.आरे बाबत सर्व राजकीय पक्षांनी आपापली भूमिका जाहीर करावी.आम्ही आमची भूमिका जाहीर केली आहे.आरे प्रकरणी सर्व पक्षांनी चर्चा करावी आम्ही चर्चा करण्यात तयार आहोत असं ही उद्धव ठाकरे म्हणाले.


राज ठाकरेंचं नाव न घेता टीका

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या झंझावाती सभा सध्या सुरू आहेत.सभांमधून राज ठाकरेंनी शिवसेनेवर टीकेची झोड उठवली आहे.याबाबत बोलताना उद्धव ठाकरेंनी 'ते पुढच्या निवडणुकीत पेपर वाचण्यापूरते उतरतील' असा खोचक टोला लगावत राज ठाकरेंना चिमटा काढला.


महाघाडीला आता भूमीपुत्रांची आठवण

महाराष्ट्रातील भूमीपुत्रांचा प्रश्न हा सर्वात आधी बाळासाहेब ठाकरेंनी हातात घेतला होता.काँग्रेस -राष्ट्रवादीला आता जाग आली आहे.आज त्यांना जनतेने नाकारल्याने त्यांना भूमीपुत्रांची आठवण झाली अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली.


निर्विवाद यश मिळेल

या निवडणुकीत विरोधात कुणीही नाही.ही निवडणूक एकतर्फ़ा होत आहे.ही निवडणूक जनतेने हातात घेतली आहे.आकडेवारीवर माझा विश्वास नाही मात्र या निवडणुकीत आम्हाला निर्विवाद यश मिळेल असा विश्वास उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला.


शिवसेनेच्या वचननाम्यातील प्रमुख वैशिष्ट्ये

WebTitle : marathi news mumbai shivsena manifesto aarey maharashtra assembly election

loading image