esakal | Vidhan Sabha 2019 ठाण्यात राष्ट्रवादीचा अविनाश जाधवांना 'मनसे' पाठिंबा
sakal

बोलून बातमी शोधा

Vidhan Sabha 2019 ठाण्यात राष्ट्रवादीचा अविनाश जाधवांना 'मनसे' पाठिंबा

पुण्यानंतर आता ठाण्यात राष्ट्रवादीने अविनाश जाधवांना 'मनसे' पाठिंबा दिलाय. राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराने ठाणे शहर मतदार संघातून आपला उमेदवारी अर्ज मागे घेतलाय.

Vidhan Sabha 2019 ठाण्यात राष्ट्रवादीचा अविनाश जाधवांना 'मनसे' पाठिंबा

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुण्यानंतर आता ठाण्यात राष्ट्रवादीने अविनाश जाधवांना 'मनसे' पाठिंबा दिलाय. राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराने ठाणे शहर मतदार संघातून आपला उमेदवारी अर्ज मागे घेतलाय. अविनाश जाधवांनीही राष्ट्रवादीने दिलेल्या पाठींब्याबद्दल राष्ट्रवादीचे आभार मानलेत.  

"फॅसिझमच्या विरोधात आम्ही एकत्र आलो आहोत आणि त्यांच्याविरोधात जास्तीत जास्त लोकांना जिंकून द्यायचे आहे", असं जितेंद्र आव्हाडांनी म्हटलं. दरम्यान राष्ट्रवादीचे नेते जरी असं म्हणत असले तरी कार्यकर्त्यांना हा निर्णय फारसा पटलेला दिसत नाही. तर दुसरीकडे गेल्या पाच वर्षातील देवेंद्र सरकारच्या कामगिरीला जनता पसंती देईल असा विश्वास भाजपचे उमेदवार संजय केळकर यांनी व्यक्त केला आहे. 
 
कधी शरद पवारांसोबत विमानात तर कधी पवारांच्या घरी, राज ठाकरे यांची शरद पवारांशी जवळीक सर्वांनीच पाहिलीये. त्यामुळे याचाच परिणाम आता विधानसभेला पाहायला मिळतोय असं म्हणायला वाव राहतो.    

WebTitle : marathi news NCP supports MNS candidate Avinash Jadhav