नोटाबंदीच्या निर्णयाला सर्वांचा पाठिंबा- गडकरी

नितीन गडकरी
नितीन गडकरी

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेल्या नोटाबंदीच्या निर्णयाला बुधवार 8 नोव्हेंबर रोजी 1 वर्ष पूर्ण झाले आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईमध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पत्रकार परिषद घेत नोटाबंदीचे सामान्य लोकांना कसे फायदे झाले तसेच या पुढे व्यवहार कॅशलेस होण्यासाठी रस्त्यावरच्या टोल पासून सर्व ठिकाणी नवीन काय काय योजना असतील हे सांगितले. 

यावेळी बोलताना गडकरी म्हणाले, पंतप्रधान मोदी यांनी नोटाबंदीचा निर्णय घेतल्यानंतर डिजिटल व्यवहारांना चालना मिळाली आहे.  सर्व समान्यांपासून सर्वच स्थारांमधील लोकांचाही  चांगला प्रतिसाद या निर्णयाला मिळाला.  नोट बंदीच्या निर्णयामुळे डिजिटल व्यवहारामध्ये 58 टक्क्यांनी वाढ झाली आहे. भाजीवाले, चहावाले सगळेच जण कॅशलेस व्यवहार करताना दिसत आहेत. त्यामुळे साहजिकच डिजिटल व्यवहारांमध्ये वाढ झाली आहे चालना मिळते आहे. डिजिटल अर्थव्यवस्था ही भविष्याच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची असल्याच गडकरी म्हणाले. नोटाबंदीचे चांगले परिणाम सध्या अर्थव्यवस्थेवर दिसत आहेत. जसजसा वेळ जाईल तसे हे परिणाम अधिक चांगल्या पद्धतीने आपल्याला दिसून येतील असा विश्वासही नितीन गडकरी यांनी व्यक्त केला.

काळा पैसा ठेवणारे लोक सध्या प्रचंड नाराज झाले असल्यामुळे टीका करत आहेत. नोटाबंदी दरम्यान ज्यांनी गैरव्यवहार केले त्यांच्यावर सध्या कारवाई सुरू आहे ती सुरूच राहील. त्याच बरोबर काही ब्लॅक मनी ठेवणाऱ्या लोकांची सरकार चौकशी करत आहे. नोट बंदीच्या निर्णयामुळे प्रचंड काळा पैसा बँकेत जमा झाला असल्याचे गडकरी यांनी यावेळी बोलताना सांगितले. 

नोट बंदीचा अनेकांना थोड्या फार प्रमाणात त्रास झाला असला तरी अर्थव्यवस्था बळकट झाली आहे. त्याच बरोबर नोट बंदीमुळे सर्व लोक हसले पण राहुल गांधी रडत आहेत कारण साधारण आपली सत्ता गेल्यानंतर असेच रडावे लागते असा टोला गडकरी यांनी राहुल गांधी यांना लगावला आहे. नोटा बंदी नंतर किती लोकांनी किती पैसे जमा केले याची आकडेवारी देखील या पत्रकार परिषदेत गडकरी यांनी जाहीर केली.

पत्रकार परिषदेतील महत्वाचे मुद्दे
बँकिंग क्षेत्रामध्ये 99.99 टक्के काळा पैसा गोळा करण्यात आला. त्यापैकी 17.73 ला लाख या पैशाची चौकशी सुरू झाली आहे. 4.7 लाख संदिग्ध खाती, 3 लाख 68 कोटीची तपासणी सुरू आहे. 1.5 लाख लोकांनी अंदाजे 5 लाख कोटी बँकेत जमा केले. 

काळ्या पैशाच्या एक तृतीयांश हिस्सा जमा झाला आहे. क्लिन अर्थव्यवस्थचा शुभारंभ झाला आहे. भविष्यात कोणीही काळा धंदा करण्याचे धाडस करणार नाही. 2 हजार 134 बँक खाते असणारी एक कंपनी सापडली आहे. काही कंपन्यांची  100 हुन जास्त खाती सापडली. 1150 कंपनीवर आयकर विभागाने कारवाई केली आहे. 

रिअल इस्टेटमध्ये जास्तीत जास्त काळा पैसा वापरला जातो. रिअल इस्टेटवाल्यांची हालत खराब झाली आहे. त्यामुळे या लोकांमध्ये नाराजी आहे. होम लोन, आटो, शिक्षा लोनचे व्याज कमी झालं आहे. होम लोनच्या हप्त्यामध्ये कमी झाली झाली आहे. 2016-17 मध्ये 13 टक्के म्युच्युअल फंड मध्ये 45 टक्के वाढ झाली. त्यामुळे उद्योग वाढतील Lic, आणि निजी विमा यामध्ये देखील नोटांबंदी नंतर वाढ झाली. 

डिजिटल अर्थव्यववस्था झाली आहे. लोक जास्तीत जास्त कार्ड वापर करत 58 टक्के वाढ झाली. पीपीआयमध्ये देखील जास्त वाढ झाली. Neft मध्ये देखील वाढ झाली आहे. 7 कोटी रुपयांचा लोकांना फायदा झाला. आधार कार्ड जोडल्या गेल्यामुळे पारदर्शकता आली आणि भ्रष्टयाचार कमी झाला. भिम अँप ने व्यवहार वाढला 1 कोटीहुन अधिक श्रमिकांना epf आणि esic ने जोडले गेले. 50 लाख श्रमिकांना बँक खाते उघडले गेले. त्यामुळे त्यांच्या खात्यात मजदूरी जमा होते. खोट्या नोटा कमी झाल्या. आणि आतंकवादी कारवाया देखील कमी झाल्या. खोट्या नोटा सर्वाधिक आतंकवादा साठी वापरल्या जात असत मात्र आता ते प्रमाण घटले आहे. 

खोट्या नोटा  8 लाख 6 हजार 380 एवढ्या पकडल्या गेल्या आहेत. 5 ऑगस्ट 2017 मध्ये 56 लाख लोकांनी कर भरला. ही संख्या मागच्या वर्षी 22 लाख होती. 34.25 टक्के लोकांनी स्वताहून कर भरला आहे.  देशात 378 टोलनाके आहेत. साडे तीन हजार लेनबोर्ड फास्ट ट्रॅक लेन तयार होणार. डिसेंबर नंतर गाड्यावर ही सीसटम असणार आहे. जीएसटी नंतर देखील फायदा झाला. 22 सेज आणि 17 टॅक्ससे कमी झाले. जीएसटी नंतर हे सगळं जवळपास संपत आले  आहेत. आता ऑपट्रॉय निघाला आहे त्यामुळे एक ट्रक 300 ते 350 किलोमीटर चालत आहे. ट्रक मालकांना दीड लाख रुपयांचा फायदा होत आहे. लॉजीस्टिक कॉस्ट कमी झाली आहे. ट्रान्सपोर्ट आपण पाण्यातून करायचा विचार करत आहोत. 18 टक्केपासून 12 टक्क्यांवर लॉजीस्टिक कॉस्ट आली तर फायदा होईल. 2 लाख कोटीचे ऍग्रीरिमेन्ट लॉजीस्टिक पार्कसाठी साइन झाले आहेत.

वसई-विरार नवा ब्रीज मंजूर, ब्रिजच्या बाजूची जागा जेएनपीटीसाठी. मुंबईवरचा ताण कमी होणार. जेएनपीटीवरून नंतर समुद्र मार्गें करणार आहोत. नंबर दोनचा धंदा आणि ज्या नेत्यांचा याला सपोर्ट होता ते आज ओरडताना दिसत आहेत. 

12 हजार किलोमीटरचे नवीन रस्ते सुरू करत आहोत. या वर्ष भरात 26 पक्रल्प पूर्ण होणार आहेत. त्यानंतर पुढील प्रकल्प हाती घेतले जाणार आहेत. महाराष्ट्राला दोन वर्षात 40 टक्के सिंचनावर नेऊ यासाठी मुख्यमंत्री आणि मी स्वतः ( नितीन गडकरी) काम करत आहोत. रोड अपघाताची संख्या 50 टक्के कमी करण्यासाठी विशेष योजना प्रयत्न सुरू आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com