महिलादिनी पालघरमध्ये रंगणार महिला क्रिकेट स्पर्धा

प्रमोद पाटील 
मंगळवार, 6 मार्च 2018

सफाळे (पालघर) : पालघर पोलीस स्टेशन, साईविराज महिला क्रिकेट कमिटी व सकाळ  तनिष्का ग्रुप ऑफ पालघर यांच्या संयुक्त विद्यमाने पालघर येथील आर्यन हायस्कूलच्या मैदानावर येत्या गुरुवारी (ता. 8) पालघर महिला क्रिकेट चषक 2018 चे प्रथमच आयोजन करण्यात आले आहे. 

या स्पर्धेच्या उदघाटन प्रसंगी पालघर जिल्हा पोलीस अधीक्षक मंजुनाथ सिंगे, पालघरचे नगराध्यक्ष उत्तम पिंपळे, जिल्हा परिषदेच्या महिला-बाल कल्याण विभागाच्या सभापती धनश्री चौधरी, जिल्हा परिषद उपमुख्य कार्यकारी अधिकारी संघरत्ना खिल्लारे, जिल्हाधिकारी कार्यालय चिटणीस उज्वला भगत आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. 

एकदिवसीय होणाऱ्या या स्पर्धेत पालघर तालुक्यातील सोळा महिलांचे संघ सहभागी होणार आहेत. प्रत्येक सहभागी संघामध्ये 9 + 2 राखीव (11) खेळाडू असतील. एका संघात पंचवीस वर्षाखालील कमाल 3 खेळाडू खेळविले जातील. 25 वर्षाखालील महिलेला एका सामन्यात फक्त एकच षटक गोलंदाजी करता येईल. तसेच  प्रत्येक खेळाडूचे आधार कार्ड/पॅन कार्ड सोबत आणणे बंधनकारक राहील. या स्पर्धेची जोरदार तयारी सुरु असून ही स्पर्धा रंगतदार होईल अशी चर्चा आहे.

या महिला क्रिकेट चषक स्पर्धेचे लाॅटस मंगळवारी (ता. 6) पालघर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांच्या दालनात जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विजय खरपडे यांच्या प्रमुख उपस्थितीत टाकण्यात आले. यावेळी खरपडे यांनी पालघर जिल्हयातील महिला सक्षमीकरणासाठी आपण विविध महत्त्वाकांक्षी उपक्रम राबविणार असून अलीकडे प्रत्येक गोष्टीत महिला पुढे जात आहेत याचा आनंद व्यक्त केला. यावेळी पालघर तालुका शारीरिक शिक्षण शिक्षक संघटनेचे अध्यक्ष प्रमोद पाटील, क्रीडा तज्ञ संतोष चुरी, सामाजिक कार्यकर्ते विशाल भानुशाली, साईविराज महिला क्रिकेट कमिटीच्या अध्यक्ष डॉ. साईली भानुशाली पालघर तनिष्काच्या दिपा पामाळे, स्नेहल किणीकर, प्रफुल्लता पाटील यांच्यासह सोळा संघांचे संघनायक उपस्थित होते. 

या स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ त्याच दिवशी संध्याकाळी पाच वाजता होणार असून या समारंभास आमदार पासकल धनारे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद बोरीकर, डहाणू उपविभागीय अधिकारी आचल गोयल,आंतरराष्ट्रीय अॅधलिट स्नेहल राजपूत, उपजिल्हा धिकारी उमेश बिरारी आदी मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडणार आहे. 

तरी यावेळी अधिकाधिक प्रेक्षकांनी उपस्थित राहून महिलांना प्रोत्साहन द्यावे असे आवाहन आयोजक तथा   साईविराज महिला क्रिकेट कमिटी पालघरच्या अध्यक्ष डॉ. साईली भानुशाली यांनी केले आहेे. 
 
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Marathi news palghar news women s cricket matches on womens day