Mumbai University | आयडॉल प्रवेशासाठी पुन्हा मुदतवाढ

तेजस वाघमारे
Tuesday, 9 February 2021

मुंबई विद्यापीठाच्या दूर व मुक्त अध्ययन संस्थेच्या जानेवारी सत्राच्या प्रवेशास 17 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

मुंबई  : मुंबई विद्यापीठाच्या दूर व मुक्त अध्ययन संस्थेच्या जानेवारी सत्राच्या प्रवेशास 17 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. जानेवारी सत्राचे प्रवेश 19 जानेवारीपासून सुरू झाले असून, आजपर्यंत जानेवारी सत्रात 2 हजार 577 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले. दरम्यान, राज्य शिक्षण मंडळाच्या बारावी पुरवणी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना अजूनही प्रवेश मिळाला नसल्याने आयडॉलकडून या जानेवारी सत्रात बीए किंवा बीकॉमच्या प्रथम वर्षात प्रवेश घेता येणार आहे. हे सर्व प्रवेश ऑनलाईन आहेत. विद्यार्थ्यांनी विद्यापीठाच्या https://old.mu.ac.in/distance-open-learning/ या संकेतस्थळावरून प्रवेश घ्यावा, असे आवाहन केले आहे. 

मुंबई, ठाणे, रायगड. पालघर परिसरातील बातम्यांचा आढावा घेण्यासाठी येथे क्लिक करा

विद्यापीठ अनुदान आयोगाने वर्ष 2020 मध्ये मुंबई विद्यापीठास जानेवारी सत्राच्या प्रवेशास मान्यता देण्यात आली होती. यानुसार 2020 च्या जानेवारी सत्रात प्रथमच 900 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला होता. 2021 च्या जानेवारी सत्राचे प्रवेश सुरू असून, 17 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. या सत्रामध्ये विद्यार्थी बीए, बीकॉम, एम.ए, एम.कॉम व एमए शिक्षणशास्त्र या पाच अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश घेता येतील. 

यंदापासून सेमिस्टर पद्धत 
आयडॉलमध्ये प्रथमच सेमिस्टर पद्धत सुरू होत असून, या जानेवारी सत्रामध्ये पदवीच्या प्रथम वर्ष बीए, बीकॉमबरोबरच पदव्युत्तर प्रथम वर्ष एम.ए व एम.कॉममध्येही सेमिस्टर पद्धत सुरू करण्यात येत आहे. एमएमध्ये मराठी, हिंदी व इंग्रजी हे भाषा विषय असून, मानव्य व सामाजिक शास्त्रामध्ये इतिहास, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र व समाजशास्त्र या विषयात प्रवेश घेता येईल. एम.कॉममध्येही अकाउंट्‌स व व्यवस्थापन असे दोन समूह विषय विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध आहेत.

----------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

marathi news students Mumbai University Re extension for Idol Admission education


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news students Mumbai University Re extension for Idol Admission education