उद्धव ठाकरेंचे दुसरे सुपुत्र तेजस ठाकरे यांनीही आदित्य ठाकरेंसाठी वरळी मतदार संघात जोरदार बॅटिंगला सुरवात केलीये. तेजस ठाकरे यांनी वरळीतील एका रॅलीत 'आरे'वर आपलं मत व्यक्त केलंय.
"आरेमध्ये माझं काम सुरु आहे, गेली अनेक वर्ष मी तिथे फिरतोय. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत आरेला वाचवण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार", असं तेजस ठाकरे यांनी म्हटलंय. दरम्यान, "या लढाईत अन्य वन्यजीव प्रेमी आणि मी एकत्र आहोत", हे देखील तेजस ठाकरे यांनी सांगितलंय.

तेजस ठाकरे हे सध्या आदित्य ठाकरे यांचा प्रचार करण्यास व्यस्त आहेत. "आदित्य ठाकरे हे वरळीत सर्वाधिक मताधिक्याने निवडून येणारच आणि येत्या 24 तारखेला महाराष्ट्रात भगवा फडकणार", असा विश्वासही तेजस यांनी बोलून दाखवला.
तेजस ठाकरे हे स्वभावाने माझ्यासारखे आहेत असं खुद्द बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते. त्यामुळे तेजस ठाकरे यांच्याविषयी कायमच सर्वांमध्ये उत्सुकता आहे. त्यातच ठेजस ठाकरे हे उद्धव ठाकरे यांच्यासोबत राजकीय व्यासपीठावर देखील पाहायला मिळाले आहेत.
Webtitle : marathi news tejas thackeray on aarey forest of mumbai