esakal | मराठी पाट्यांसाठी वसईत धार्मिक स्थळांना पाठवल्या नोटीसा
sakal

बोलून बातमी शोधा

मराठी पाट्यांसाठी वसईत धार्मिक स्थळांना पाठवल्या नोटीसा

मराठी पाट्यांसाठी वसईत धार्मिक स्थळांना पाठवल्या नोटीसा

sakal_logo
By
संदीप पंडित

विरार: महाराष्ट्रात राहूनही मराठी भाषेकडे (marathi language) प्रत्येक बाबतीत दुर्लक्ष होत आहे. आपली राज्य भाषा दुर्लक्षित राहत असल्याने आता धार्मिक स्थळांवर (Religious places) मराठी पाट्या (Marathi signboard) लावण्याचे आदेशच काढण्यात आले आहेत. वसईतील काही धार्मिक स्थळी दर्शनी भागात मराठी भाषा डावलली गेल्याने सुमारे 50 धार्मिक स्थळांना सहाय्यक धर्मदाय आयुक्तांकडून नोटिसा (notices) बजावल्या आहेत. मराठी भाषेव्यतिरिक्त इतर भाषा वापरल्याने यावर कार्यवाही करण्याचे आदेश यामध्ये दिले आहेत.

वसईतील अनेक दुकाने, हॉटेल्स यांच्यावर मराठी पाट्या नसल्याने वसईतील मनसैनिक आक्रमक झाले होते. त्यांच्या पाट्या काढून याबाबत तक्रारी करण्यात आल्या होत्या. त्यानंतर या ठिकाणाहून इतर भाषिक पाट्या नाहीशा होऊन मराठी पाट्या दुकांदारांतर्फे लावण्यात आल्या होत्या. त्यानंतर आता मोर्चा वसईतील धार्मिक स्थळांकडे वळला आहे. वसईतील धार्मिक स्थळी मराठी भाषेव्यतिरिक्त इतर भाषांचे फलक दर्शनी भागात लावण्यात आल्याने याबाबत आयुक्तांकडे तक्रारी प्राप्त झाल्या होत्या.

हेही वाचा: विरार: बिल्डरच्या हत्येच्या कटाचा उलगडा, दारुच्या टेबलावर प्लानिंग

मराठी एकीकरण समितीचे उपाध्यक्ष विक्रम डांगे, सारंग जाधव, सागर पाटील यांनी धर्मादाय आयुक्त पालघर यांच्याकडे तक्रार केली होती. महाराष्ट्र राज्याच्या परिपत्रकानुसार मराठी नामफलक लावण्याचे निर्देश द्यावेत अशी मागणी त्यांनी केली होती. त्यानुसार पालघर सहाय्यक धर्मादाय आयुक्त दि. कृ . पाटील यांनी तालुक्यातील सुमारे 50 धार्मिक स्थळांना नोटिसा बजावून मराठी भाषेत फलक लावण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे याठिकाणी मराठी भाषेचे फलक लागणार असल्याचे बोलले जात असुन मराठीला डावलणाऱ्यांना ही चपराक असल्याचे मानले जात आहे.

loading image
go to top