esakal | विरार: बिल्डरच्या हत्येच्या कटाचा उलगडा, दारुच्या टेबलावर प्लानिंग
sakal

बोलून बातमी शोधा

विरार: बिल्डरच्या हत्येच्या कटाचा उलगडा, दारुच्या टेबलावर प्लानिंग

विरार: बिल्डरच्या हत्येच्या कटाचा उलगडा, दारुच्या टेबलावर प्लानिंग

sakal_logo
By
विजय गायकवाड

नालासोपारा - चार वर्षांपूर्वीच्या भांडणाचा राग मनात धरून, दारूची पार्टी करताना हत्येचा कट रचून, पाच जणांनी विरार (Virar) मध्ये बांधकाम व्यावसायिकाची (builder murder) निर्घृणपणे हत्या केली असल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. या प्रकरणात एका आरोपीला विरार पोलिसांनी अटक केली असून चार जण अद्यापही फरार आहेत. फरार आरोपीच्या शोधासाठी विरार पोलिसांनी स्वतंत्र पथक तयार केले असून, लवकरच या आरोपींच्या मुसक्या आवळल्या जातील असा विश्वास तापासाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

चंद्रकांत चौहान असे अटक केलेल्या आरोपीचे नाव असून तो विरार पूर्व फुलपाडा परिसरातील राहणारा आहे. तर निशांत कदम (वय 31) असे हत्या झालेल्या बांधकाम व्यावसायिकांचे नाव आहे. काल सोमवारी पहाटे तीन ते साडे तीनच्या सुमारास निशांत हे श्रावणी सोमवार निमित्त विरार पूर्व फुलपाडा येथील पापडखिंड मधील शंकराच्या मंदिरात दर्शनासाठी निघाले होते. घराबाहेर काही अंतरावर चिंचेच्या झाडाजवळ निशांत पोहचताच पाच आरोपीनी लोखंडी रॉड, धारदार हत्याराने त्यांच्यावर वार करून, त्यांची हत्या करून फरार झाले होते.

हेही वाचा: NCP ने फडणवीसांवर केलेल्या आरोपांना प्रवीण दरेकरांचे प्रत्युत्तर

घटनेची माहिती मिळताच विरारचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश वराडे, सहाय्यक पोलीस आयुक्त रेणुका बगाडे, यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देऊन, मृतदेह ताब्यात घेऊन, विरार पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल केला होता. फरार झालेल्या आरोपीना पकडण्यासाठी वेगवेगळे तीन ते चार पथकं तयार करून, अवघ्या पाच तासाच्या आत एका संशयित आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले होते. त्याची चौकशी केली त्याने आपला गुन्हा काबुल केल्यानंतर चंद्रकांत चौहान या आरोपीला अटक केली आहे. इतर पाच आरोपींची नावही पोलिसांना समजली आहेत. ही हत्या जुन्या वादातून केली असल्याचे पोलीस तपासात उघड झाले असल्याचे विरारचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश वराडे यांनी सांगितले आहे.

हेही वाचा: 'पाकिस्तान मुर्दाबाद' घोषणा देणाऱ्यांवर तालिबानकडून गोळीबार

बिल्डर निशांत यांनी चार वर्षांपूर्वी चंद्रकांत चौहान या आरोपीला व्यक्तीगत वादातून मारहाण केली होती. त्यानंतर त्यांचे कोणत्या न कोणत्या कारणाने ग्रुपमध्ये वाद ही होत होते. रविवारी आरोपी दारूची पार्टी करत बसले होते. दारू पित असताना जुन्या भांडणाचा राग आरोपीना अनावर झाला आणि त्यांनी निशांत कदम यांचा गेम करायचे ठरविले. आरोपी आणि बिल्डर एकाच परिसरात राहणारे असल्याने निशांत किती वाजता घराबाहेर पडतो, हे त्यांना माहीत होते. पहाटे दर्शनासाठी निशांत घराबाहेर पडले असता त्यांच्यावर पाच जणांनी प्राणघातक हल्ला करून त्याची हत्या केली असल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे.

loading image
go to top