

Marathi students have immense career opportunities in the digital era through content creation, journalism, publishing and new media, said Dr. Rahul Patil while addressing students at a literary event in Vasai.
Sakal
विरार : बदलत्या तंत्रज्ञानयुगात मराठी विद्यार्थ्यांसाठी संधींची दालने खुली झालेली असून सामाजिक, सांस्कृतिक, क्रीडा आणि राजकीय क्षेत्रांमध्ये दर्जेदार आशयनिर्मितीची मोठी गरज असून नव्या माध्यमांकडे केवळ छंद म्हणून नव्हे, तर उत्पन्नाचे प्रभावी साधन म्हणूनही पाहण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन डॉ.राहुल पाटील यांनी वसई मध्ये केले. विद्यावर्धिनी शिक्षणसंस्थेच्या अण्णासाहेब वर्तक महाविद्यालयाच्या मराठी विभागातर्फे अण्णाभाऊ साठे जयंती आणि मराठी वाङ्मयमंडळाचा उद्घाटन समारंभ उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून गोखले एज्युकेशन सोसायटीच्या कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय, जव्हार येथील मराठी विभागप्रमुख डॉ. राहुल पाटील यांनी मार्गदर्शन केले.