esakal | मराठी नाट्य कलाकार संघाची कलाकार दत्तक योजना
sakal

बोलून बातमी शोधा

Natya Parishad

मराठी नाट्य कलाकार संघाची कलाकार दत्तक योजना

sakal_logo
By
संतोष भिंगार्डे

मुंबई: अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेची एक घटक असलेल्या मराठी नाट्य कलाकार (Marathi theatre artist) संघातर्फे कलाकार दत्तक योजना (Artist adoption scheme) राबविण्यात येत आहे. आतापर्यंत तीन दानशूर व्यक्तींनी (donators) या योजनेत सहभागी झाल्या आहेत. तसेच अन्य दानशूर व्यक्तींनी या योजनेत सहभागी व्हावे, असे आवाहन संघाचे अध्यक्ष प्रदीप कबरे (pradip kabre) यांनी केले आहे.

हेही वाचा: एल्गार परिषद प्रकरण: आरोपी कवी वर्वरा राव यांना हायकोर्टाचा दिलासा

याबाबत संघाचे अध्यक्ष प्रदीप कबरे म्हणाले, की सरकारकडे आपण विविध प्रकारची मदत मागीत असतो आणि ते आवश्यक आहेच. परंतु आपलेही काही दायित्व असावे या उद्देशाने ही कल्पना मला सुचली.आतापर्यंत दाजी भाटवडेकर स्मृती सेवायन या संस्थेबरोबरच अभिनेत्री वंदना गुप्ते आणि अभिनेत्री-निर्माती अर्चना नेवरेकर यांनी या योजनेत रस दाखविला आहे. दानशूर व्यक्तींनी वर्षाला अठरा हजार रुपये आमच्याकडे जमा करायचे आहेत.

आम्ही त्यांनी दत्तक घेतलेल्या रंगकर्मीला दरमहा पंधराशे रुपये त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करणार आहोत. दत्तक घेणाऱ्या दानशूर व्यक्तीला रंगकर्मीचे नाव आम्ही सुचविणार आहोत. त्याकरिता आम्ही काही नियमावली बनविली आहे. त्यानुसार रंगकर्मीची निवड केली जाणार आहे. एखादी दानशूर व्यक्ती एक वर्ष किंवा त्याहून अधिक काळ या योजनेत भाग घेऊ शकते. ते सगळे त्या व्यक्तीवर अवलंबून असेल. आता समाजातील विविध दानशूर व्यक्तींनी पुढे यावे आणि या योजनेत सहभागी व्हावे, असे आम्ही त्यांना आवाहन करीत आहोत. या योजनेची अंमलबजावणी येत्या २५ नोव्हेंबर रोजी जागतिक रंगकर्मी दिनी होणार आहे.

loading image
go to top