esakal | 'या' भाजप नगरसेवकाला भोवलं खंडणीप्रकरण, कोर्टाने सुनावली पोलिस कोठडी..
sakal

बोलून बातमी शोधा

'या' भाजप नगरसेवकाला भोवलं खंडणीप्रकरण, कोर्टाने सुनावली पोलिस कोठडी..

'या' भाजप नगरसेवकाला भोवलं खंडणीप्रकरण, कोर्टाने सुनावली पोलिस कोठडी..

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

मुंबई : ठाण्यात राजकीय वातावरण तापलंय. कारण खंडणी प्रकरणी फरार असलेल्या ठाण्याच्या भाजपच्या नगरसेवकाला ठाण्यातील कासारवडवली पोलिसांनी अखेर अटक केलीये. भाजप नगरसेवक नारायण पवार यांच्यावर तीन कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप आहे. भाजप नगरसेवक नारायण पवार यांच्या अटकेनंतर ठाण्यात राजकीय खळबळ उडाली आहे. दरम्यान कोर्टातील हजेरीनंतर आता नारायण पवार यांना चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.  

मोठी बातमी : मुलं आणि महिलांच्या तस्करीबाबतचं धक्कादायक वास्तव, मुंबई एक नंबरवर तर पुणे...

काय आहे प्रकरण : 

ही घटना आहे २०१५ ची. २०१५ मध्ये नारायण पवार हे काँग्रेसमध्ये होते. २०१५ साली नारायण पवार यांनी तब्ब्ल तीन कोटींची खंडणी मागितली होती. या प्रकरणात  नारायण पवार यांनी चार अन्य लोकांना हाताशी धरत जमिनीची कागदपत्रे तयार केली होती. या कागदपत्रांच्या मदतीने नारायण पवार यांनी एका बिल्डरकडे तीन कोटींची खंडणी मागितल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. या केसमध्ये त्यांनी तीन लाख रुपये घेतल्याचा देखील त्यांच्यावर आरोप आहे. 

मोठी बातमी : राज्य अर्थसंकल्पाचा मुहूर्त ठरला, 6 मार्चपासून सुरू होणार अधिवेशन!

स्वतः केलं आत्मसमर्पण : 

ठाण्यातील कासारवडवली पोलिस ठाण्यात याबाबत तक्रार दाखल करण्यात आली आहे. तक्रार दाखल झाल्यानंतर नारायण पवार फरार होते. दरम्यान नारायण पवार यांनी आज स्वतः पोलिसांकडे जात आत्मसमर्पण केलं आहे. याबाबत नारायण पवार यांनी सर्वात आधी थेट सुप्रीम कोर्टात धाव घेत अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. सुप्रीम कोर्टाने हा अर्ज फेटाळत ठाणे कोर्टात जावं असं सांगितलं होतं. यानंतर नारायण पवार यांनी ठाणे सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला. हा अर्ज देखील ठाणे सत्र न्यायालयाने फेटाळून लावला.   

मोठी बातमी : त्यांनी अनेकांना वाचवलं, अन् त्यांनाच रुग्णालयात घेतलं नाही!

WebTitle : extortion case thane court orders police custody to bjp corporator narayan pawar