

Marine Drive Accident Claims Three Lives
Esakal
Marine drive Accident: भरधाव येणाऱ्या दुचाकीने रस्ता ओलांडणाऱ्या पादचाऱ्याला धडक दिल्यानंतर झालेल्या अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला. ही घटना सोमवारी पहाटे साडेपाचच्या सुमारास मरीन ड्राइव्ह येथे घडली. हा अपघात इतका भीषण होता, की पादचारी ज्येष्ठ नागरिक आणि दुचाकीवरील तरुण व तरुणी जागीच ठार झाले. कृष्णा देसाई (वय १९), मुस्कान शेख (वय १८) आणि किशोर लामणे (वय ६२) अशी मृतांची नावे आहेत. मरीन ड्राइव्ह पोलिस घटनेचा तपास करीत आहेत.