

Gateway-Mandwa Ferry
ESakal
अलिबाग : गेटवे मांडवा जलवातूक तब्बल तीन महिन्याच्या बंदीनंतर १ सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. गौरी-गणपतीच्या सणासाठी अलिबाग-मुरूडमधील चाकरमान्यांसाठी हा सर्वात सोईचा मार्ग आहे. मांडवा बंदरातील जेट्टीच्या दुरुस्तीचे काम सुरू आहे. ही जेट्टी काही दिवसांतच बंदरात आल्यानंतर निर्धारित वेळापत्रकानुसार सुरू होईल, असे जलवाहतूक संस्थांचे मत आहे.