मारुती ने परत मागवल्या तब्बल 63 हजार कार्स, हे आहे कारण..

सकाळ वृत्तसेवा
Friday, 6 December 2019

भारतातील कार बनवणारी अग्रगण्य कंपनी मारुतीने आपल्या तब्बल साठ हजारांपेक्षा जास्त कार्स परत मागवल्या आहेत. यामध्ये Ciaz, Ertiga आणि XL6 या कार्सचा समावेश आहे

भारतातील कार बनवणारी अग्रगण्य कंपनी मारुतीने आपल्या तब्बल साठ हजारांपेक्षा जास्त कार्स परत मागवल्या आहेत. यामध्ये Ciaz, Ertiga आणि XL6 या कार्सचा समावेश आहे. काही सुरक्षेच्या कारणास्तव मारुतीकडून या सर्व गाड्या पुन्हा तपासणीसाठी मागवण्यात आल्या आहेत. 

मारुती कंपनीकडून मिळालेल्या माहितीनुसार या गाड्यांच्या जनरेटर युनिटमध्ये तांत्रिक बिघाड आहे. मारुतीकडून आता या कार्सची तपासणी केली जाणार आहे. यासाठी ग्राहकांकडून कोणतेही अधिकचे पैसे आकारले जाणार नाहीत. ही बातमी आल्यानंतर मारुतीच्या शेअर्समध्ये जवळजवळ दोन टाक्यांची घसरण झालीये.

महत्त्वाची बातमी :  तनुश्री दत्ताची नाना पाटेकरांविरोधात पुन्हा याचिका 

नुकतंच मारुती सुझुकीने आपल्या गाड्यांच्या किमतीमध्ये जानेवारी 2020 पासून वाढ करणार असल्याची घोषणा केलीये. मागील काही काळात वाढलेल्या कच्च्या मालाच्या किमतीमुळे गाड्यांच्या किमतीत वाढ करणार असल्याचं कंपनीने घोषित केलंय. मात्र पुढील वर्षी नक्की किती रुपयांची दरवाढ होणार, हे अद्याप स्पष्ट केलेलं नाही. 

एकीकडे मारुतीने दरवाढ करण्याची घोषणा केलीये. तर दुसरीकडे दोन करोड कार्स विकण्याचा विक्रम देखील केलाय. मारुतीने आपली पहिली कार Maruti800, 14 डिसेंबर 1983 रोजी बाजारात आणली होती. दरम्यान गेल्या 36 वर्षात मारुतीने हा रेकॉर्ड केलाय.    

महत्त्वाची बातमी राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली 'ही' मागणी

ह्युंदाईने देखील परत मागवल्या 16,409 कार्स :    

गेल्याच महिन्यात ह्युंदाई कंपनीच्या कार्सच्या CNG फिल्टरमध्ये बिघाड असल्याची बाब समोर आली होती. त्यामुळे ह्युंदाईने देखील तब्बल 16,409 कार्स तपासणीसाठी मागवल्या आहेत. यामध्ये Grand i10 आणि Xcent या कार्सचा समावेश आहे. ह्युंदाईच्या या कार्स 1 ऑगस्ट 2017 ते 30 सप्टेंबर 2019 दरम्यान बनवल्या गेल्यात. या सर्व गाड्यांमध्ये कंपनी फिटेड CNG कीट दिला गेलाय.   

WebTitle : maruti india recalls more than sixty thousand ciaz ertiga and xl6 cars


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: maruti india recalls more than sixty thousand ciaz ertiga and xl6 cars