esakal | राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली 'ही' मागणी
sakal

बोलून बातमी शोधा

राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली 'ही' मागणी

राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली 'ही' मागणी

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

ठाकरे घराण्यातील एका भावाने दुसऱ्या भावाकडे एक अत्यंत महत्त्वाची मागणी केलीये. होय, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ही मागणी केलीये. यामध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे मराठी माणसाचा मुद्दा उचलून धरलाय. महाराष्ट्रातील मुलांना नोकऱ्यांमध्ये प्राधान्य देण्याची मागणी राज ठाकरे यांनी केलीये. मनसे नेते संदीप देशपांडे यांनी दोन व्हिडीओ ट्विट केले आहेत. यामध्ये राज ठाकरे यांनी अशा प्रकारच्या मागण्या करणारे व्हिडीओ जोडण्यात आले आहेत. 

महत्त्वाची बातमी :  बाबासाहेबांचे निवासस्थान राष्ट्रीय स्मारक व्हावे; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची इच्छा
 

हेही वाचा : कृपया 'कांदा द्या', असा आग्रह करू नये!

काय आहे राज ठाकरे यांची मागणी ?  

महाराष्ट्र राज्याने झारखंड सारखं अधिवास धोरण (डोमिसाईल पॉलिसी ) जाहीर करण्याची मागणी राज ठाकरे यांनी केलीये. यामधून महाराष्ट्रातील नागरिक कोण हे सर्वात आधी समजेल. याचसोबत महाराष्ट्र सरकारने आपल्या राज्यातील लोकांसाठी सुरु केलेल्या योजना, त्याच राज्यातील नागरिकांना मिळतायत का? हे समजू शकेल. आजही मोफत घरांची योजना, जी 1995 मध्ये बाळासाहेब ठाकरे यांनी सुरु केली त्याचा फायदा बाहेरील नागरिकांना मिळालाय. महाराष्ट्रातील जमीन, महाराष्ट्रातील पाणी, महाराष्ट्रातील वीज याचा फायदा महाराष्ट्रातील लोकांना झाला पाहिजे. महाराष्ट्रात तयार होणाऱ्या सुविधांचा फायदा परराज्यातील नागरिकांना मिळणार असेल तर त्याचा उपयोग काय? असा सवाल राज ठाकरे यांनी उपस्थित केलाय. 

WebTitle : Raj Thackeray to Uddhav Thackeray on rights of citizens of maharashtra