
मुंबई : अंधेरीच्या पोटनिवडणुकीसाठी उद्धव ठाकरे गटाच्या अडचणी अद्याप संपलेल्या नाहीत. कारण मशाल हे चिन्ह त्यांच्याकडून जाण्याचा धोका निर्माण झाला आहे. यापूर्वीपासून समता पार्टीचं मशाल हे चिन्ह आहे. त्यामुळं समता पार्टीनं शिवसेनेच्या चिन्हाला विरोध केला असून उद्या दिल्ली हायकोर्टात याचिका दाखल करणार आहे. (Mashal symbol of Uddhav Thackeray group would be gone coz Samata Party file plea in Delhi High Court tomorrow)
समता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष उदय मंडल यांनी यासंदर्भात दिल्ली हायकोर्टात उद्या याचिका दाखल करणार आहेत. मंडल म्हणाले, शिवसेनेला जे मशाल निशाण दिलं आहे त्यावर माझा आक्षेप आहे. यासाठी आम्ही दिल्ली हायकोर्टात एक याचिका दाखल करणार आहोत. कारण मशाल चिन्ह ही अजूनही समता पार्टीची ओळख आहे. हे चिन्ह समता पार्टीसाठी राखीव ठेवण्यात आलं आहे. यामुळं निवडणूक आयोगानं शिवसेनेला हे चिन्ह कसं काय दिलं याचं मला आश्चर्य वाटतं आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.