मुंबईकरांनो आता 'इथेही' मास्क वापरणं बंधनकारक; नाहीतर १ हजाराचा दंड..

mask
mask

मुंबई  : सार्वजनिक ठिकाणी वावरता मास्क वापरणे बंधनकारक आहे.मात्र,कार्यालये आणि वाहानांमधील प्रवासी मास्क वापरत नाही.मात्र,आता तांच्यांकडूनही 1 हजार रुपयांंचा दंड वसुल करण्यात येणार आहे. महापालिकेकडूनही आता ही कारवाई होणार आहे.

मुंबईत सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरणे 13 मार्च रोजी  बंधनकारक करण्यात आले आहे.मात्र,खासगी वाहानांमधे बसलेले प्रवासी मास्क वापरत नसल्याचे पाहायला मिळते. त्याच बरोबर आता कार्यालयेही सुरु झाले आहेत.

टप्प्पया टप्प्याने लॉकडाऊन अधिक शिथील करण्यात येणार आहे.त्यामुळे प्रवासा दरम्यान खासगी वाहानांमध्ये बसलेल्यांनाही मास्क वापरणे बंधनकारक आहे. तसेच कार्यालयांमध्येही मास्क वापरणे बंधनकारक आहे.

कोविडच्या संक्रमणावर नियंत्रण ठेवण्यासाठी नागरीकांनी पुरेशी खबरदारी घेणे गरजेचे आहे. मात्र,काही नागरीक पुरेशी खबरदारी घेत नसल्याने महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी हे  सक्त आदेश देण्यात आले आहेत.

पोलिस विभागा बरोबरच महापालिकेच्या सहाय्यक आयुक्तांनी नेमलेल्या अधिकार्यांनाही 1 हजार रुपये दंड आकारण्याचे अधिकार देण्यात आलेे आहे.

- रस्ते, कार्यालये,दुकाने,बाजार, दवाखाने,रुग्णालये यासारखी सार्वजनिक ठिकाणं.

- कार्यालयीन वापराची तसेच खासगी वाहानांं मध्येही मास्क लावणेे बंधनकारक आहे.

- कोणत्याही बैठकिला किंवा एकत्र येताना मास्क वापरणे आवश्यक आहे.

- प्रमाणित मास्क, थ्री प्लाय मास्क,औषधाच्या दुकानांमध्ये उपलब्ध असलेले कापडी मास्क, घरगुती कापडाचे मास्क. 

mask is compulsory now in mumbai read full story 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com