

Guinea Silk Mill Fire in Boisar Tarapur MIDC Raises Industrial Safety Concerns After Firefighters Complete Rescue Operations
esakal
-संतोष घरत
बोईसर : तारापूर औद्योगिक वसाहतीमधील ‘गिनी सिल्क मिल’ या नामांकित कंपनीला आज सकाळी साडेसातच्या सुमारास भीषण आग लागली. सुदैवाने मोठा अनर्थ टळला असून कोणतीही जीवितहानी झालेली नाही; मात्र आगीत कंपनीचे आर्थिक नुकसान झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तारापूर एमआयडीसीतील प्लॉट क्रमांक १५ वर असलेल्या 'गिनी सिल्क मिल'च्या संगणक व स्टोअर रूममधून सकाळी साडेसातच्या सुमारास अचानक दाट धूर निघू लागला. पाहता पाहता आगीने रौद्ररूप धारण केले.