Video : उरणमधील आग आटोक्यात; 4 जणांचा मृत्यू

टीम ई-सकाळ
मंगळवार, 3 सप्टेंबर 2019

जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट (जेएनपीटी), पनवेल नगरपालिका आणि इतर परिसरातील अग्निशमन दलाच्या गाड्या उरणला रवाना करण्यात आल्या होत्या. रायगडचे जिल्हाधिकारी विजय सूर्य़वंशी यांनी आगीवर नियंत्रण मिळविल्याची माहिती दिली.

उरण : शहराजवळच्या ओएनजीसी प्रकल्पाला आज सकाळी 6.45 च्या सुमारास भीषण आग लागली. यामध्ये चार जणांचा मत्यू झाला. मृतांमध्ये प्रकल्पाचा सर व्यवस्थापकाचा समावेश आहे. प्रकल्पाच्या 40 वर्षांच्या इतिहासात आगीची ही तिसरी मोठी घटना आहे. ऐन गणोत्सवातील या दुर्घटनेमुळे तालुक्यात घबराट आहे.

प्रकल्पात वायूगळती झाल्याने आग लागली. अल्पावधीतच तिने उग्ररूप घेतले. अचानक आलेल्या   या संकटामुळे कामगारांचे एकच धावपळ उडाली. रसायन मिश्रीत पाण्यामुळे प्रकल्पातील नाल्यातून आग बाहेर पसरली. त्यामुळे शेजारच्या नागावातही घबराट पसरली. 

आग प्रकरणात मृतांची नावे -
1. एन. ए. नायका,  CISF जवान (HL/CA)
2. एम. पासवान ,CISF जवान (CT /DCPO)
3. एस. पी. कुशवाहा ,CISF जवान (CT/ Fire )
4. सी. एम. राव (GM /Prod)

या घटनेनंतर तालुक्यात धूर पसरला होता. उग्र वासामुळेही अनेकाना त्रास झाला. काहींन श्वशनाच्या तक्रारी केल्या. आगीची माहिती मिळताच सिडको आणि ओएनजीसीच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला. 5 तासांनंतर 95 टक्के आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. आगीच्या घटनेनंतर नागाव परिसरातील अनेक घरातील नागरीकांनी घरे सोडली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: massive fire at uran ongc plat