भिवंडीत मुसळधार पावसाला सुरुवात, वीजपुरवठा खंडित...

भिवंडीत मुसळधार पावसाला सुरुवात, वीजपुरवठा खंडित...

मुंबई- भिवंडी शहरासह ग्रामीण भागात मुसळधार पाऊस सुरु आहे. गेल्या अर्ध्या तासापासून भिवंडीत पावसानं जोर धरला आहे. मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. असाच पावसाचा जोर कायम राहिल्यास सखल भागात पाणी साचू शकते. तीनबत्ती मार्केट, कमला हॉटेल, भंडारी कंम्पाऊंड, बालाजी नगर या आणि अशा अनेक सखल भागात पाणी साचण्याची दाट शक्यता आहे. 

मुंबईत सध्या ढगाळ वातावरण असून, पावसाची शक्यता आहे.सोमवारी सकाळी पावसानं मुंबईत हजेरी लावली होती. त्यामुळे मुंबईकरांना काहीसा  दिलासा मिळाला. या पावसामुळे शहरात गारठा पसरला होता. त्यात हवामान विभागानं मान्सूनपूर्व पावसाची शक्यता वर्तवली आहे. मात्र अधुनमधून पडणाऱ्या या पावसामुळं मुंबईत उकाडाही प्रचंड वाढतोय.

निसर्ग चक्रीवादळामुळं अनेक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला. हे वादळ कोकण किनारपट्टीवर धडकलं. या चक्रीवादळाचा फटका अलिबाग, श्रीवर्धन, मुरुड, दिवेआगर या तालुक्यांना जोरदार बसला. या चक्रीवादळानं दिशा बदलल्यानं मुंबईवरील संकट टळलं मात्र तरी या वादळाचा फटका मुंबईलाही बसला. मुंबईतही जोरदार पावसानं हजेरी लावली होती. त्यावेळी या मान्सूनपूर्व पावसामुळं मुंबईच्या सखल भागांत पाणी साचलं होतं. जोरदार पाऊस आणि सोसाट्यांचा वाऱ्यामुळे मुंबईत 100 हून जास्त झाडं कोसळण्याचीही घटना घडल्या होत्या. 

राज्यात मान्सून होणार दाखल

येत्या 48 तासांत बंगालच्या खाडीवर कमी दाबाचा पट्टा तयार होण्याची शक्यता असल्यानं पुढील 24 तासांत देशातील अनेक राज्यांमध्ये मुसळधार पाऊस होण्याची दाट शक्यता आहे. शकतो. चक्रीवादळाचा प्रभाव ओसरताच मान्सूनसाठी पुन्हा पोषक वातावरण निर्माण होईल आणि मान्सून पुन्हा महाराष्ट्राच्या दिशेने आगेकूच करेल, अशी माहिती हवामान खात्याने दिली होती. त्यासाठी अरबी समुद्राच्या आकाशात पुन्हा आद्रता वाढीस लागणं गरजेचं असल्याचंही हवामान खात्यानं म्हटलं होतं. पोषक वातावरणामुळे पुढच्या दोन ते तीन दिवसांमध्ये तळकोकणातून मोसमी वारे राज्यात दाखल होण्याची शक्यता आहे. त्यानुसार महाराष्ट्रात साधारणपणे 10 जूनला मान्सूनचं आगमन होईल अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे.

massive pre-monsoon showers in bhiwandi electricity disturbed in bhiwandi area

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com