सोनू सूद आणि उद्धव ठाकरे यांच्यात 'त्या' रात्री मातोश्रीवर काय झाली होती चर्चा? वाचा...

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 9 June 2020

अभिनेता सोनू सूद म्हणतो, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्याशी सकारत्मक चर्चा झाली.

मुंबई - सध्या मुंबईत राजकारण सुरु आहे ते अभिनेता सोनू सूद करत असलेल्या कामावरून. लॉकडाऊन सुरु झाला आणि मुंबईत अडकलेल्या परप्रांतीय मजुरांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला. हातावर पोट असणाऱ्या परप्रांतीय मजुरांसमोर आता खायचं काय हा भीषण प्रश्न उभा राहिला. याच विवंचनेत सापडलेल्या अनेक मजुरांनी थेट घराचा रास्ता धरला. रस्त्यावरून चालत हे सर्व परप्रांतीय मजूर बिहार, उत्तर प्रदेशकडे निघाले.

हे सर्व पाहता अभिनेता सोनू सूद याने परप्रांतीय मजुरांना घरी पोहोचवण्याचा निश्चय केला. सोनू सूद याच्या कामाची सर्वच स्तरातून दखल देखील घेतली गेली. अगदी राज्यपालांनी देखील सोनूला भेटीस बोलावून त्याची पाठ थोपटली. अशातच शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामानातून सोनूवर संजय राऊतांनी टीकास्त्र डागलं आणि मुंबईत राजकारण सुरु झालं. 

मोठी बातमी - मन हेलावणारी बातमी! मृत्यू दाखला देण्यास नकार, तब्बल 16 तास मृतदेह घरात.... 

दरम्यान त्याच दिवशी म्हणजे सोमवारी रात्री उशिरा सोनुने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर जात भेट घेतली. मात्र सोमवारी रात्री मातोश्रीवर नक्की काय झालं? याबाबत सर्वांनाच उत्सुकता आहे. अभिनेता सोनू सूद याने सोमवारी रात्री साडे दहा वाजता मातोश्रीवर उद्धव ठाकरेंची भेट घेतली तेंव्हा आदित्य ठाकरे देखील उपस्थित होते. दरम्यान त्याबद्दल सोनू सूद याने नेमकं त्या रात्री काय बोलणं झालं याबाबत माहिती दिलीये.   

अभिनेता सोनू सूद म्हणतो, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्याशी सकारत्मक चर्चा झाली. मला फक्त काम करायचं आहे राजकारण नाही. मला लोकांना घरी पोहोचवायचं आहे. ज्यापराकारे सरकार लोकांना घरी पोहोचवण्यासाठी मदत करतेय त्याचप्रकारे मलाही फक्त मजुरांना घरी सुखरूप पोहोचवायचं आहे. सर्व देश माझं कुटुंब असून मी देखील त्या कटुंबाचा सदस्य आहे.  मला कोणताही राजकीय पक्ष मदत करत नाही, असं देखील सोनुने त्यावेळी सांगितलं. 

मोठी बातमी - 2 मिनिटं काढा आणि हे आधी वाचा, मास्क लावून जॉगिंग किंवा चालण्याचा व्यायाम कराल आणि भयंकर स्थिती ओढावेल...

दरम्यान शिवसेनेचे फायरब्रॅन्ड नेते संजय राऊत यांनी सोनू सूदवर टीकास्त्र डागत सोनू सूद करत असलेल्या कामामागे राजकीय सपोर्ट असल्याचं राऊत म्हणाले होते. यावरून भाजप आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून शिवसेनेवर तोफ डागलेली पाहायला मिळाली. 

what happened at matoshree when sonu sood went to meet CM uddhav thakeray


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: what happened at matoshree when sonu sood went to meet CM uddhav thakeray