
Mumbai Protest
Sakal
मुंबई : ‘सरकारविरोधातील आवाज दडपण्यासाठी आणलेला जनसुरक्षा कायदा रद्द करा,’ अशी जोरदार मागणी गुरुवारी (ता. २) महाविकास आघाडीने केली. या कायद्याच्या विरोधातील घोषणांनी मंत्रालयाचा परिसर दणाणून गेला. लोकशाही आणि संविधान रक्षणासाठी आघाडीच्या वतीने मुंबईत शांती मार्च काढण्यात आला.