

15 Minute Journey Turns Into 6 Hour Ordeal in Mankhurd
Esakal
मानखुर्द परिसरात शीव-पनवेल महामार्गावर उड्डाणपुलाच्या बांधकामासाठी वापरले जाणारे मोठे खोदकाम यंत्र कोसळल्याने मंगळवारीरात्री झालेल्या अपघातात एका पोलिस शिपायाचा मृत्यू झाला. अपघातग्रस्त यंत्र बाजूला हटविण्यासाठी संपूर्ण रस्ताच अडवून ठेवल्याने बुधवारी दिवसभर शीव-पनवेल महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली होती. परिणामी, १५ मिनिटांच्या अंतरासाठी वाहन चालकांना पाच ते सहा तास वाहतूक कोंडीत अडकून राहावे लागले होते. रात्री उशिरापर्यंत वाहतूक कोंडी सुटली नव्हती. गुरुवारी सकाळी वाहतूक सुरळीत सुरू आहे. Mumbai traffic update long jams on Sion Panvel route after accident vehicle removal causes delays