Matheran Mini Train : पर्यटकांना मध्य रेल्वेची खास भेट; वातानुकूलित सलून कोच जोडणार

पर्यटकांचे खास आकर्षण असणारी माथेरानची राणी असलेली मिनीट्रेनला अतिरिक्त विशेष एसी सलून डबा जोडण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे.
Matheran Mini Train
Matheran Mini Trainsakal
Summary

पर्यटकांचे खास आकर्षण असणारी माथेरानची राणी असलेली मिनीट्रेनला अतिरिक्त विशेष एसी सलून डबा जोडण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे.

मुंबई - पर्यटकांचे खास आकर्षण असणारी माथेरानची राणी असलेली मिनीट्रेनला अतिरिक्त विशेष एसी सलून डबा जोडण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे.

मिनीट्रेनला जोडलेला एसी सलून कोच हा आठ आसनी असून नेरळ ते माथेरान आणि परतीच्या प्रवासासाठी त्याच दिवशी त्याचप्रमाणे रात्रीच्या मुक्कामासाठी बुकिंगसाठी पर्यटकांसाठी उपलब्ध असणार आहेत.

माथेरान हे मुंबईतील नागरिकांसाठी सर्वात जवळचे आणि सर्वात लोकप्रिय पर्यटन स्थळ आहे. मध्य रेल्वेने अमन लॉज आणि माथेरान दरम्यान प्रवाशांसाठी रेल्वेची शटल सेवेसह हे ठिकाण एक प्रमुख पर्यटन स्थळ म्हणून लोकप्रिय करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. मध्य रेल्वेने आता पर्यटकांचा सोयीसाठी मिनीट्रेनला अतिरिक्त विशेष एसी सलून डबा जोडण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे. नेरळ-माथेरान टॉय ट्रेन, जी १०० वर्षांहून अधिक जुनी आहे, ही भारतातील मोजक्या पर्वतीय रेल्वेंपैकी एक आहे आणि टॉय ट्रेनमध्ये एसी सलूनमधून प्रवास करणे हा केवळ एक प्रकारचा अनुभवच नाही तर निसर्ग जवळून पाहण्याचा आणि माथेरानच्या नैसर्गिक वातावरणाच्या शांततेत मग्न होण्याचा थरार सुद्धा आहेत.

काय आहे तिकीट दर -

- एकाच दिवशी राऊंड ट्रिप पूर्ण होईल: आठवड्यातील दिवशी ३२ हजार ८८ करांसहीत दर

- रात्रभर मुक्कामासह राउंड ट्रिप: आठवड्यातील दिवशी ३२ हजार ८८ करांसहीत आणि १ हजार ५०० प्रति तासाने दर लागणार

- वीकेंडला ४४ हजार ६०८/- करांसहीत दर

वीकेंडला) रात्रभर मुक्कामासह राउंड ट्रिप प्रवासासाठी ४४ हजार ६०८ करांसह + डिटेंशन शुल्कासह १ हजार ८०० प्रति तासाने.

असे करा आरक्षण -

एसी सलून रेल्वे कोच आरक्षित करण्यासाठी पर्यटकांना चार पर्याय दिले आहेत. ज्यामध्ये ए किंवा बी आणि परतीसाठी सी किंवा डी यापैकी एक पर्याय पर्यटक निवडू शकतो. इच्छुक पर्यटकांनी निवडलेल्या प्लॅनच्या एकूण भाड्याच्या २० टक्के आगाऊ रक्कम भरून प्रवासाच्या तारखेच्या ७ दिवस अगोदर १० हजार रुपये परत करण्यायोग्य सुरक्षा ठेवीसह एसी सलून आरक्षित करू शकतात. उर्वरित ८० टक्के प्रवासाच्या तारखेच्या ४८ तास अगोदर रक्कम भरावी लागेल, असे न केल्यास आगाऊ रक्कम आणि सुरक्षा ठेव जप्त केली जाईल आणि बुकिंग रद्द झाली असे मानले जाईल. ४८ तासांच्या आत बुकिंग रद्द केल्यास कोणताही परतावा दिला जाणार नाही.

अशी भरा रक्कम -

मुख्य बुकिंग पर्यवेक्षक, नेरळ किंवा मध्य रेल्वेवरील कोणत्याही जवळच्या स्थानकांवर यूपीआय, पीओएस किंवा रोख रकमेद्वारे बुकिंग करता येते. जर नेरळ व्यतिरिक्त इतर स्टेशनवर पैसे भरले असतील तर पैसे पावती क्रमांक नेरळ कार्यालयाला जमा केल्याच्या १ दिवसाच्या आत कळवावे.

असे असणार एसी सलून कोचबवेळापत्रक -

नेरळ ते माथेरान -

ए- नेरळ प्रस्थान सकाळी 08.50 वा. माथेरान आगमन सकाळी 11.30 वा.

बी- नेरळ प्रस्थान सकाळी 10.25 वा. माथेरान आगमन दुपारी 01.05 वा.

सी - माथेरान प्रस्थान 02.45 वा. नेरळ आगमन दुपारी 04.30 वा.

डी- माथेरान प्रस्थान दुपारी 04.00 नेरळ आगमन संध्याकाळी 06.40 वा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com