
माथेरान : पावसाळी पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी रविवारी माथेरानमध्ये आलेल्या पर्यटकांना परतीच्या प्रवासासाठी वाहनच उपलब्ध न झाल्याने त्यांचा अनेक अडचणींचा सामना करावा लागला. नेरळ-माथेरान टॅक्सीचालक-मालक संस्थेने सेवा बंद केल्याने पर्यटकांना नऊ किलोमीटर अंतर पायपीट करावी लागली. यात लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग व्यक्तींचे हाल झाल्याने पर्यटकांनी संताप व्यक्त केला.