Matheranchi Rani : डोंगरदऱ्यांतून पुन्हा धावणार ‘माथेरानची राणी’! ३० ऑक्टोबरपासून नेरळ-माथेरान मिनी ट्रेन सुरू

हिरव्यागार डोंगररांगा, धुक्याने वेढलेले घाट आणि नागमोडी वळणांवरून होणारा संथ प्रवास... माथेरानच्या निसर्गसौंदर्याची सफर घडवणारी पर्यटकांची लाडकी ‘माथेरानची राणी’ पुन्हा रुळावर धावणार.
Matheran Chi Rani

Matheran Chi Rani

sakal

Updated on: 

- नितीन बिनेकर

मुंबई - हिरव्यागार डोंगररांगा, धुक्याने वेढलेले घाट आणि नागमोडी वळणांवरून होणारा संथ प्रवास... माथेरानच्या निसर्गसौंदर्याची सफर घडवणारी पर्यटकांची लाडकी ‘माथेरानची राणी’ पुन्हा रुळावर धावणार आहे. पावसाळ्यात सुरक्षिततेच्या कारणास्तव बंद ठेवण्यात आलेली नेरळ-माथेरान मिनी ट्रेनची सेवा ३० ऑक्टोबरपासून पूर्ववत होणार आहे. त्यामुळे डोंगरदऱ्यांमधून प्रवास करत माथेरानच्या निसर्गाचा आनंद घेण्यासाठी पर्यटकांना पुन्हा रेल्वेचा पर्याय उपलब्ध होणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com