esakal | संभाजी भिडेंना मातोश्रीवर भेट नाकारली...! 
sakal

बोलून बातमी शोधा

संभाजी भिडेंना मातोश्रीवर भेट नाकारली...! 

संभाजी भिडेंना मातोश्रीवर भेट नाकारली...! 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

सत्तेचा पेच वाढला असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी शिवसेनेची मनधरणी करण्यासाठी उध्दव ठाकरेंची भेट घेण्यास गेलेल्या संभाजी भिडे यांना भेट नाकारण्यात आली.  आज अचानक भिडे थेट मातोश्रीवर उध्दव ठाकरे यांची भेट घेण्यासाठी  गेले. मात्र,

सध्या संभाजी भिडे यांना भेट देण्याचे कोणतेही कारण नाही. आदराने त्यांचा चहापाणी देवून पाहूणचार करा. पण भेटता येणार नाही हे कळवा. असा आदेश मातोश्रीतून मिळाला. त्यामुळे संभाजी भिडे यांना उध्दव ठाकरे यांची भेट मिळाली नाही. हिंदुत्वासाठी भाजप-शिवसेनेनं एकत्र यायला हवं. काहीतरी तोडगा काढायलाच हवा अशी भूमिका घेवून संभाजी भिडे उध्दव ठाकरे यांना भेटण्यासाठी गेले होते अशी माहिती सूत्रांकडून मिळतेय.

विधानसभा निवडणुकीचे निकाल लागून आज १३ दिवस झाले तरी सत्तेचा पेच अद्यापही सुटलेला नाही.भाजपकडून अद्याप सत्तास्थापनेचा दावा करण्यात आलेला नाही. तर शिवसेना सुद्धा मुख्यमंत्रिपदावर ठाम आहे. दरम्यान राज्यात राजकीय घडामोडींनाही वेग आलाय.

भाजप स्थापन करणार अल्पमतातील सरकार

8 तारखेला महाराष्ट्रातील सरकारचा कार्यकाळ संपतोय. त्यानंतर, महाराष्ट्र राष्ट्रपती राजवटीकडे वाटचाल करेल अशी देखील शक्यता वर्तवली जातेय. दरम्यान, त्या आधी भाजप अल्पमतातील सरकार स्थापन करणार असल्याची माहिती आता सूत्रांकडून मिळतेय. मात्र, असं झाल्यास आणि शिवसेनेची ताठर भूमिका तशीच राहिल्यास हे सरकार किती दिवस तग धरणार हा गुलदस्त्यातील प्रश्न आहे. 

Webtitle : matoshree refused to meet sabhaji bhide