'त्या' निनावी कॉलनंतर 'मातोश्री'च्या सुरक्षेत वाढ; गुन्हे शाखा करतेय तपास

अनिश पाटील
Sunday, 6 September 2020

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मुंबईतील 'मातोश्री' निवासस्थानी दोन निनावी दूरध्वनी आल्यानंतर तेथील सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.

मुंबई -  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मुंबईतील 'मातोश्री' निवासस्थानी दोन निनावी दूरध्वनी आल्यानंतर तेथील सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. दूरध्वनी करणा-या व्यक्तींने कथीत स्वरूपात गँगस्टर दाऊद इब्राहिमचा हस्तक असल्याचे सांगितले आहे. याप्रकरणी गुन्हे शाखा अधिक तपास करत आहे.

वाह मुंबईकर! गणेशोत्सवातील महत्त्वाच्या योगदानाबद्दल 'या' परिषदेकडून कौतुक

 शनिवारी रात्री 11 च्या सुमारास पहिला दूरध्वनी मातोश्रीच्या रिसेप्शनला आला होता. त्यात आपण दुबईवरून बोलत असल्याचे सांगून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी बोलायचे असल्याचे दूरध्वनी करणा-या व्यक्तीने सांगितले. रिसेप्शनवरून फोन बंद करण्यात आल्यानंतर संबंधीत व्यक्तीने पुन्हा दूरध्वनी केला व फोन डिस्कनेक्ट केल्यास मातोश्री उडवण्याची धमकी दिली.  

'मातोश्री'वर आलेल्या दुबईच्या कॉल बाबत अनिल परब यांचे स्पष्टीकरण; वाचा काय म्हटले?

याप्रकरणानंतर याबाबतची माहिती सुरक्षा अधिका-यांना देण्यात आली. त्यांनी पोलिसांना याप्रकरणी माहिती दिल्यानंतर पोलिसांनी तातडीने मातोश्रीवर धाव घेतली. सध्या गुन्हे शाखेसह राज्य गुप्तचर विभाग आणि सर्व सुरक्षा यंत्रणा तपास करत आहेत.

'मातोश्री'वर आलेल्या फोनवरील धमकीनंतर मातोश्री निवास्थानासोबतच ठाकरे कुटुंबाचीही सुरक्षा वाढवण्यात आली आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांनीही प्रकरणाची माहिती घेऊन आरोपीवर कारवाई करण्याचे आदेश पोलिसांना दिले आहेत. गुन्हे शाखा सध्या याप्रकरणी तपास करत आहे

----------------------------------------

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Matoshris safety increased after that anonymous telephone call; Crime Branch is investigating