Vasai Virar News : वसई विरार महानगरपालिकेच्या विरोधी पक्ष नेतेपदी मनोज पाटील यांची निवड
VVMC General Body Meeting : वसई-विरार महानगरपालिकेच्या पहिल्या महासभेत महत्त्वपूर्ण नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या. महापौर अजीव पाटील यांनी भाजपचे मनोज पाटील यांची विरोधी पक्षनेतेपदी, तर प्रफुल्ल साने यांची सभागृह नेतेपदी निवड घोषित केली.
विरार : वसई विरार महानगरपालिकेची आज पहिली महासभा झाली. या सभेत विरोधी पक्ष नेतेपदी भाजपचे मनोज पाटील यांची निवड महापौर अजीव पाटील यांनी घोषित केली. या निवडणुकीय स्थायी समिती सदस्यांची निवड जाहीर करण्यात आली.